शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:15 IST

कामचटका द्वीपकल्पातील शक्तिशाली भूकंपाने केवळ रशियालाच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांना अलर्ट मोडवर टाकले आहे.

रशियाच्या पूर्व कामचटका द्वीपकल्पात आज (३० जुलै) भूकंपाचा एक जोरदार धक्का बसला. यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार, या भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल इतकी प्रचंड होती आणि त्याची खोली १९.३ किलोमीटर नोंदवली गेली. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, लोक घरातील महागड्या वस्तूंची पर्वा न करता जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. एका किंडरगार्टन शाळेचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तीव्र भूकंपाच्या धक्क्यानंतर संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

त्सुनामीचा धोका: अलर्टवर असलेले देशया शक्तिशाली भूकंपाने केवळ रशियालाच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांना अलर्ट मोडवर टाकले आहे. रशिया, जपान, अमेरिका (हवाई आणि अलास्का), कॅनडा (ब्रिटिश कोलंबिया), न्यूझीलंड, चीन, इंडोनेशिया, तैवान, फिलिपिन्स, पेरू, मेक्सिको आणि इक्वाडोर यांसारख्या देशांमध्ये त्सुनामीची चेतावणी जारी करण्यात आली आहे.

जपानमधील होक्काइडो बेटावरील नेमुरो किनारपट्टीवर सुमारे ३० सेंटीमीटर उंचीच्या लाटा आदळल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर रशियाच्या कुरील द्वीपसमूहातही पहिली त्सुनामी लाट पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. जपानने तातडीने २० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, आपल्या फुकुशिमा अणुभट्टी परिसरातील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. 

कामचटका: भूकंपांचं घरकामचटका हा रशियाच्या सुदूर पूर्वेकडील एक विशाल, जंगली, डोंगराळ आणि ज्वालामुखीय प्रदेश असलेला द्वीपकल्प आहे. हा सुमारे १२०० किलोमीटर लांब आणि ४८० किलोमीटर रुंद आहे. येथील हवामान उप-आर्क्टिक प्रकारातील असून, हिवाळा दीर्घ आणि बर्फाळ असतो, तर उन्हाळा खूपच लहान आणि थंड असतो. येथे दोन प्रमुख पर्वतरांगा आणि अनेक नद्या असून, कामचटका नदी सर्वात महत्त्वाची आहे. तुंद्रा प्रदेशापासून ते घनदाट जंगलांपर्यंत विविध प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात.

कामचटका द्वीपकल्प भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. हा प्रदेश पॅसिफिक प्लेट आणि नॉर्थ अमेरिकन प्लेटच्या सबडक्शन झोनवर (जिथे एक प्लेट दुसऱ्या प्लेटखाली सरकते) स्थित आहे. यामुळे येथे सातत्याने भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकासारख्या घटना घडतात. कामचटका हा ‘रिंग ऑफ फायर’चा भाग आहे, जो प्रशांत महासागराभोवती पसरलेला आहे आणि जिथे जगातील ७५% पेक्षा जास्त ज्वालामुखी आणि ९०% भूकंप होतात. त्यामुळे कामचटकाला भूकंपाचे घर असे म्हटले जाते.

इतिहास आहे साक्षी!कामचटकामध्ये यापूर्वीही मोठे भूकंप झाले आहेत. ४ नोव्हेंबर १९५२ रोजी येथे ९.० तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्यामुळे हवाईमध्ये सुमारे ३० फूट उंचीच्या त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. सुदैवाने, त्यावेळी कोणतीही मोठी जीवितहानी झाली नव्हती. याच जुलै २०२५ महिन्यात या परिसरात पाच मोठे धक्के नोंदवले गेले आहेत, ज्यात एका धक्क्याची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल होती.

सध्या सरकारी यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लोकांना किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अजूनपर्यंत कोणत्याही मोठ्या त्सुनामीची किंवा जीवितहानीची पुष्टी झाली नसली तरी, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. या घटनेमुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :russiaरशियाEarthquakeभूकंपTsunamiत्सुनामीInternationalआंतरराष्ट्रीय