शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाचा पोलीस चौकीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:51 IST

उत्तर म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाच्या युवकांनी बुधवारी पहाटे एका पोलीस चौकीवर हल्ला केला. असे प्रकार वाढीस लागल्यामुळे देशातील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यंगून : उत्तर म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाच्या युवकांनी बुधवारी पहाटे एका पोलीस चौकीवर हल्ला केला. असे प्रकार वाढीस लागल्यामुळे देशातील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.म्यानमारमध्ये लष्करी सत्तांतराला प्रखर विरोध करणारे आंदोलक व सुरक्षा दलांमधील संघर्षात काचिन समुदायाची महत्त्वाची भूमिका असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, काचिन इंडिपेन्डन्स आर्मीने काचिन राज्यातील श्वेगू शहरात बुधवारी पहाटे एका पोलीस ठाण्यावर हल्ला चढविला. यावेळी हल्लेखोरांनी एका पोलीस अधिकाऱ्याला जखमी केले असल्याचे समजते.यापूर्वी शनिवारी म्यानमारच्या कारेन गुरिल्लाच्या सदस्यांनी लष्कराच्या एका चौकीवर हल्ला करून कब्जा मिळविला होता. यानंतर लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात १० जण ठार झाले होते व हजारो लोक सीमा ओलांडून थायलंडमध्ये पळून गेले होते.कारेन नॅशनल युनियनने (केएनयू) हवाई हल्ल्यांबाबत निवेदन जारी करून म्हटले आहे की, म्यानमारचे सैनिक सर्व मोर्चांवर आमच्या भागात पुढे सरकत आहेत व आम्ही याचे चोख प्रत्युत्तर देत आहोत. केएनयू कारेन अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी मुख्य राजकीय आघाडी आहे. म्यानमारमध्ये जारी असलेल्या संघर्षात देशाच्या पूर्व भागात संकट वाढले आहे. कारेन समुदायाच्या सुमारे ३००० सदस्यांनी शेजारी देश थायलंडमध्ये तात्पुरता आश्रय घेतला आहे. तथापि, थायलंडच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, देशात म्यानमारमधून आलेले सुमारे २०० लोक आहेत व सीमेवरून परत जाण्याची ते तयारी करीत आहेत. 

टॅग्स :Myanmarम्यानमारInternationalआंतरराष्ट्रीय