कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावाचा सामना करत असलेल्या नेपाळमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरूच आहेत. नेपाळमध्ये गुरूवारी विरोधी पक्षाला नवं सरकार स्थापन करण्यास आवश्यक असलेलं बहुमत सिद्ध करण्यास अपयश आलं. यानंतर नेपाळच्या संसदेनं मोठा राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रुपात के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा सोपवली. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. तीन दिवसांपूर्वी ओली यांना संसदेच्या प्रतिनिधी सभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु यानंतर विरोधकांनाही बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे नेपाळच्या संविधानातील कलमानुसार प्रतिनिधी सभेत सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या रूपात ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी ओली यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
Nepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 15:10 IST
के.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात आलं होतं अपयश.
Nepal : के.पी.शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी; विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश
ठळक मुद्देके.पी.शर्मा ओली यांच्याकडे पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची धुरा.काही दिवसांपूर्वी त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्यात आलं होतं अपयश.