शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:39 IST

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांचे पणजोबा शाहनवाज भुट्टो यांचे जुनागढशी विशेष नाते आहे. शाहनवाज हे सिंध प्रदेशातील खूप मोठे जमीनदार होते.

काही दिवसापूर्वी भारतानेपाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढला. यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील इतिहासावर चर्चा सुरू झाली. पाकिस्तान भारतापासून ज्यावेळी वेगळा झाला त्यावेळी भारतातील अनेकांना पाकिस्तानात येण्यासाठी फितवले होते. यामध्ये सिंध प्रदेशातील शाहनवाज  यांचे नावही येते. 

पाकिस्तान वेगळा होऊन फक्त दोन महिने झाले होते. त्यावेळी एक चार्टर्ड विमान भारतातून पाकिस्तानला जात होते. विमानातील प्रवासी आणि सामान व्हीआयपी होते. विमानाच्या मागील भागात एका राजाचे सामान भरलेले होते. हिरे, दागिने, सोने आणि चांदी यामध्ये होते.

'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

विमानाच्या मध्यभागी अनेक कलाकार बसले होते आणि त्या काळातील एक नवाब त्यांच्या पत्नींसह पुढच्या सीटवर बसले होते. या विमानात दागिन्यांच्या पेट्यांसह डझनभर कुत्रेही बसले होते. 

हे विमान पाकिस्तानातील कराची विमानतळावर उतरले. सर्व काही व्यवस्थित झाले पण नवाबच्या दोन्ही पत्नी भारतातच राहिल्या.

जुनागढच्या नवाबांची दिशाभूल

हे नवाब गुजरात येथील जुनागढचे तिसरे नवाब होते. त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. पण ज्यावेळी नेहरू आणि सरदार वल्लभभाईंनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली तेव्हा ते पाकिस्तानात पळून गेले.

या नवाबांना पाकिस्तानात जाण्यास तयार करण्यात एका राजकीय कुटुंबाचा सहभाग होता. पाकिस्तानमधील राजकारणात भुट्टो कुटुंब आजही सक्रिय आहे. पाकिस्तान सरकारमधील भागीदार बिलावल भुट्टो यांचे पणजोबा शाहनवाज भुट्टो यांनी नवाब महावत खान यांना पाकिस्तानची स्वप्ने दाखवली आणि त्यांना नव्याने स्थापन झालेल्या इस्लामिक देशात संपत्ती देण्याचे आश्वासन दिले. यानंतरच त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात पलायन केले. 

नवाब महाबत खान यांचे कुटुंब अफगाणिस्तानातील बाबी जमातीचे होते. ही जमात मुघलांशी एकनिष्ठ होती. हे लोक सम्राट हुमायूनच्या काळात भारतात आले आणि वेगवेगळ्या युद्धांमध्ये त्यांना मदत करून त्यांचा विश्वास जिंकला. नंतर शाहजहानने त्यांना काठियावाडसह संपूर्ण गुजरातचे राज्य दिले. जुनागढचे राज्य समुद्राजवळ असल्याने या प्रांतात समुद्री व्यापार होत होता आणि या प्रवाहामुळे येथे भरपूर संपत्ती येत होती. 

बिलावल भुट्टो यांचे पणजोबा शाहनवाज भुट्टो यांचे जुनागढशी विशेष नाते होते. शाहनवाज हे सिंध प्रदेशातील खूप मोठे जमीनदार होते. त्यावेळी त्यांच्याकडे अडीच लाख एकरपेक्षा जास्त जमीन होती. १९४७ पर्यंत शाहनवाज भुट्टो देशाचे एक मोठे मुस्लिम नेते बनले होते. १९४७ मध्येच ते जुनागढ राज्यातील नवाब मुहम्मद महाबत खान तिसरे यांचे दिवाण बनले.

त्यावेळी सरदार पटेल स्वतंत्र संस्थानांना भारतात विलीन करण्यासाठी प्रयत्न करत होते. जुनागढ हे एक संस्थान होते तिथे लोकसंख्या हिंदू होती पण राजा मुस्लिम होता. सुरुवातीला महाबत खान-तिसरा भारतात सामील होण्यास तयार होता. पण इथे शाहनवाज भुट्टो आणि मोहम्मद अली जिना यांनी राजकारण केले.

जुनागढच्या बदल्यात काश्मीरची सौदेबाजी

हे दोन्ही नेते जुनागढच्या बदल्यात काश्मीरची सौदेबाजी करू इच्छित होते. या दोन्ही नेत्यांनी नवाबचे अशा प्रकारे ब्रेनवॉश केले की त्याने स्वातंत्र्याच्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी जुनागढचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्याची घोषणा केली.

पाकिस्तानात अडचणी वाढल्या

ज्या नवाबांनी आपली राज्ये भारतीय प्रजासत्ताकात विलीन केली त्यांना सरकारने पूर्ण आदर दिला, पण पाकिस्तानात गेलेल्या नवाबांची स्थिती वाईट होती. भारतात अशा नवाबांना खूप आदर मिळत असे, सरकार त्यांना अडीच लाखांपर्यंतची खाजगी पेन्शन दिली जात होती. नवाबांचे राजवाडे आणि त्यांची अफाट संपत्ती बराच काळ त्यांच्याकडे राहिली. दुसरीकडे, जे नवाब आपले राजवाडे आणि राज्ये सोडून पाकिस्तानात गेले त्यांना वचन दिल्याप्रमाणे तिथे वेगळे राज्य मिळाले नाही.

अशा नवाबांनी भारतातील त्यांच्या जमिनी आणि राजवाडे आधीच सोडले होते. पाकिस्तान सरकार त्यांना काही पैसे देत असे पण ते खूप कमी प्रमाणात होते. पाकिस्तानने नवाबांसाठी निश्चित केलेली खासगी रक्कम पाकिस्तानच्या संस्थानांच्या माजी राजे आणि नवाबांना दिलेल्या रकमेपेक्षा कमी होती. त्यांनाही तेवढे महत्त्व मिळाले नाही.

जर महावत खान भारतात राहिले असते तर त्यांना सुमारे दोन लाख रुपये मिळाले असते. तसेच त्यांच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचा मोठा भाग सुरक्षित राहिला असता. पण पाकिस्तानात त्यांना काहीही मिळाले नाही.

पाकिस्तानच्या राजकारणात भुट्टो यांचं नाव मोठं झालं होतं.  शाहनवाज नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झाले पण नवाबला ओळखणारे कोणीही नव्हते. १९५९ मध्ये नवाब महाबत खान यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जुनागढचा असा नवाब बनला त्याच्याकडे काहीच नव्हते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत