शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांना लेखनाबद्दल तुरुंगात धाडू नये; संयुक्त राष्ट्रे मोहम्मद झुबेर यांच्या अटकेबाबत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:16 IST

२०१८ साली धार्मिक भावना दुखावणारे ट्वीट केल्याच्या  आरोपांवरून मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

संयुक्त राष्ट्रे : पत्रकार करत असलेले लेखन, ट्वीट किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडू नये, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेसंदर्भात हे मत व्यक्त करण्यात आले. लोकांचे भाषण, विचारस्वातंत्र्य जपले जावे. त्यांना कोणीही धमक्या देऊ नयेत, अशी अपेक्षाही संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली. २०१८ साली धार्मिक भावना दुखावणारे ट्वीट केल्याच्या  आरोपांवरून मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईबाबत गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे की, सर्व लोकांचे भाषण व विचारस्वातंत्र्य जपले जाईल, याची काळजी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे. पत्रकारांच्या लेखन, वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडणे अयोग्य आहे. मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेबाबत पाकमधील एका पत्रकाराने दुजारिक यांना प्रश्न विचारला होता. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर खोटे पुरावे सादर करणे, फसवणूक तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखणे, या आरोपांखाली तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलिसांनी अटक केली होती. या अटकेवरून सामाजिक वर्तुळात माेठी खळबळ उडाली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी असून संताप व्यक्त केला आहे.

‘ते’ ट्विटर अकाउंट गायबमोहम्मद झुबेर यांना चार वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटप्रकरणी अटक करण्यात आली. एका ट्विटर युजरने दिल्ली पोलिसांना टॅग करून केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, सोमवारी झुबेर यांना अटक झाल्यापासून मात्र ज्या ट्विटर खातेदाराच्या तक्रारीच्या आधारे कारवाई झाली ते खातेच ट्विटरच्या प्लॅटफॉर्मवरून गायब झाल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाjailतुरुंगUSअमेरिका