शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:30 IST

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली.

बालकोट - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसानंतर पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेली. मात्र पत्रकारांसोबत यावेळी पाकिस्तान लष्कराचे सैन्यही त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला परदेशी पत्रकारांनी बालकोट परिसरातील स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पाकिस्तानी सैन्याकडून जाणूनबुजून घाई करत स्थानिक जनतेला पत्रकारांशी संवाद साधण्यात टाळत होते. त्यामुळे पाकिस्तानकडून नक्कीच काहीतरी लपविण्याचा प्रयत्न केला जातो असा संशय निर्माण होतोय. 

काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत असणाऱ्या बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना टार्गेट केलं होतं. मात्र पाकिस्तानकडून बालकोट भागात ज्याठिकाणी भारताने हल्ला केला तिथं दहशतवादी तळ नसून मदरसा चालविण्यात येत होती असा दावा केला होता. 

या घटनेनंतर पाकिस्तानकडून माध्यमांना दावा करण्यात आला होता की, आम्ही लवकरच पत्रकारांना ज्या भागात भारताने एअर स्ट्राईक केलं त्याठिकाणी नेण्यात येईल मात्र ते खोटं ठरलं. पाकिस्ताने 43 दिवसानंतर माध्यमांना त्या परिसरात घेऊन जात खोटं दाखविण्याचा प्रयत्न केला. आईएएनएसने बीबीसी वृत्ताचा हलावा देत सांगितले की, इस्लामाबादमधून एक हेलिकॉप्टरमधून आम्हाला घेऊन गेले त्यानंतर मनसेराजवळ हेलिकॉप्टर उतरविण्यात आलं. तेथून पुढे दीड तास अवघड असलेला डोंगराळ भागातील रस्त्यामधून आमचा प्रवास झाला असं तिथे गेलेल्या पत्रकाराने सांगितले. 

मिडीयाच्या प्रतिनिधींना तीन वेगवेगळ्या भागात नेण्यात आले. पाकिस्तानकडून त्यांना सांगितले की भारताच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात आमच्या येथील झाडांचे नुकसान झाले मात्र प्रत्यक्षात घटनास्थळावर काही खडडे आणि मुळासकट कोसळलेली झाडं दिसली. हा प्रदेश मानवी वस्तीपासून खूप दूर होता. माध्यमांनी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना विचारलं की, पत्रकारांना या ठिकाणी आणण्यासाठी तुम्हाला एवढा विलंब का झाला? यावर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तणावग्रस्त परिस्थितीत येथे लोकांना आणणं अवघड होतं. आता योग्य वेळ आली म्हणून आपल्या सगळ्या पत्रकारांचा दौरा नियोजित करण्यात आला असं पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले. तसेच यावेळी मदरसाजवळ असणाऱ्या बोर्डवर मौलाना यूसुफ अजहरचं नावं बघितलं त्यावरही विचारलेल्या प्रश्नांवर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सरळ उत्तर दिलं नाही. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान