शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत भारतीयांचा डंका! जो बायडन यांच्या 'डिजिटल स्ट्रॅटजी टीम'मध्ये काश्मीरच्या मुलीचा समावेश

By मोरेश्वर येरम | Updated: December 29, 2020 15:28 IST

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं.

ठळक मुद्देकाश्मीरमध्ये जन्मलेल्या आयशाचा अमेरिकेत बोलबालाराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये भारतीय वंशाची मुलगीआयशा शहा हिच्यावर पार्टनरशीप मॅनेजर पदाची जबाबदारी

वॉशिंग्टनअमेरिकेच्या 'व्हाइट हाऊस'मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डिजिटल स्ट्रॅटजी टीमची घोषणा करण्यात आली. यात मूळच्या काश्मीर येथे जन्म झालेल्या आयशा शहा हिची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.     

व्हाइट हाऊसमध्ये डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये आयशा शहा हिच्याकडे पार्टनरशिप मॅनेजर पदाची जबाबदारी असणार आहे. बायडन यांच्या या डिजिटल टीमचं नेतृत्व रॉब फ्लेहर्टी करणार आहेत. 

आयशा शहा हिनं याआधी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. काश्मीरमध्ये जन्मलेली आणि सध्या अमेरिकेच्या लुझियानामध्ये स्थायिक असलेली आयशा सध्या स्मिथसोनियन संस्थेसाठी अॅडव्हान्समेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करते. याआधी आयशानं जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या कॉपोरेट फंडावर सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही काम केलं आहे. त्यावेळी तिनं राष्ट्रपतींच्या स्मारकाच्या विस्ताराला पाठिंबा दिला होता. आयशानं बुय येथे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन स्पेशलिस्ट म्हणूनही काम पाहिलं आहे. 

रॉब फ्लेहर्टी नेतृत्व करत असलेल्या डिजिटल स्ट्रॅटजी टीममध्ये आयशासह इतर विविध पदांसाठी तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. यात ब्रेंडन कोहेन (प्लॅटफॉर्म मॅनेजर), महा घंदौर (डिजिटल पार्टनरशिप मॅनेजर), जोनाथन हेबर्ट (व्हिडिओ डायरेक्टर), जैमे लोपेझ (डायरेक्टर ऑफ प्लॅटफॉर्म), कारहाना मॅगवुड (क्रिएटिव्ह डायरेक्टर), अॅबी पिट्झर (डिझाइनर), ऑलिव्हिया रायसनर (ट्रॅव्हलिंग कंटेन्ट डायरेक्टर), रेबेका रिंकेविच (डेप्यूटी डायरेक्टर ऑफ डिजिटल स्ट्रॅटजी), ख्रिश्चन टॉम (डेप्यूटी डायरेक्टर ऑफ डिजिटल स्ट्रॅटजी) आणि कॅमेरुन ट्रिमबल (डायरेक्टर ऑफ डिजिटल एन्गेंजमेंट) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनUSअमेरिकाUS ElectionAmerica Election