शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

Joe Biden Inauguration Day 2021 : एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही, जो बायडन यांनी अमेरिकेचे ऐक्य साधण्याचा केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 23:37 IST

Joe Biden Swearing Ceremony : आजचा दिवस हा लोकशाहीचा दिवस आहे. देशाला दुरुस्त करण्याची गरज आहे. देशांतर्गत दहशतवादाला पराभूत करण्याची गरज आहे, असे जो बायडन म्हणाले.

ठळक मुद्दे'एकजुटीने अमेरिकेला एकत्र आणण्याचे काम करुयात. एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही. आमच्यासमोर अनेक कठीण परिस्थिती आहे. '

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात जो बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात जो बायडन म्हणाले, "एकजुटीने अमेरिकेला एकत्र आणण्याचे काम करुयात. एकजुटीशिवाय शांतता शक्य नाही. आमच्यासमोर अनेक कठीण परिस्थिती आहे. आपल्या देशाचे संविधान खूप मोठे आहे. आम्ही पुन्हा अमेरिकेला पुढे घेऊन जाऊया. शांती आणि युद्ध यामध्ये आम्ही सर्वांत पुढे आहोत. आम्ही एकत्र राहिलो तर कधीच अयशस्वी होऊ शकत नाही."

आजचा दिवस हा लोकशाहीचा दिवस आहे. देशाला दुरुस्त करण्याची गरज आहे. देशांतर्गत दहशतवादाला पराभूत करण्याची गरज आहे. कोरोना संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे येणारे संकट मोठे आहे. तसेच, अमेरिकेचे सैन्य सशक्त, प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहेत, असे जो बायडन म्हणाले.

याचबरोबर, अमेरिकेत वर्णभेदाविरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. अमेरिकेत विकास घडवण्यासाठी मेहनतीने काम करुया. मी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचेही अभिनंदन करतो. मी संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, असे जो बायडन म्हणाले. याशिवाय, कुणाबरोबरही भेदभाव होणार नाही. कॅपिटल हिलसारखा हिंसाचार पुन्हा होणार नाही. आपल्या सर्वांना एकमेकांची गरज आहे. सत्ता आणि लाभासाठी खूप काही खोटं बोललं गेले. ज्यांचे रोजगार गेले त्यांच्या कुटुंबीयांसाठी चिंतित आहे. सध्याची परीक्षेची वेळ आहे, त्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास जो बायडन यांनी यावेळी व्यक्त केला.

कमला हॅरिस यांनी घेतली उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथकमला हॅरिस यांनी आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या महिला, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या लॅटिन सदस्य न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर पदाची शपथ दिली. सोटोमेयर यांनीच जो बायडन यांना 2013 मध्ये उपराष्ट्राध्यक्ष  पदाची शपथ दिली होती. कमला हॅरिस यांनी दोन बायबल साक्षी ठेवून शपथ घेतली.

…ही तुमची वेळ आहे - बराक ओबामाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट करत जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. 'माझे मित्र जो बायडन तुमचं अभिनंदन…ही तुमची वेळ आहे,' असं ट्विट करत बराक ओबामा यांनी सोबत एक फोटो सुद्धा ट्विट केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थितीमावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. राजशिष्टाचार म्हणून ट्रम्प हे या सोहळ्याला उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र ते अनुपस्थित राहिले.दिग्गजांची उपस्थितीजो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यांच्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन तसेच जॉर्ज बुश हे माजी राष्ट्राध्याक्षही उपस्थित होते.कॅपिटल हिलमध्ये कडेकोट बंदोबस्तजो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता विचारात घेऊन या शपथविधी सोहळ्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ३५ हजार जवान तैनात करण्यात आले होते.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका