शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बायडेन कर्जात अडकले! ऑस्ट्रेलियाने क्वाडची बैठक रद्द केली, तरीही मोदी जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 09:13 IST

बायडन यांनी दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियाई सरकार उरलेल्या दोन देशांशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले होते.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पुढील आठवड्यात होणारी क्वाड देशांची बैठक रद्द झाल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बैठकीला येऊ शकत नसल्याने ऑस्ट्रेलियाने ही बैठक रद्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात या बैठकीला जाणार होते. 

बायडेन सध्या अमेरिकेतील कर्जामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा सोडविण्यात व्यस्त आहेत. यामुळे त्यांनी पुढील आठवड्यातील परदेश दौरे रद्द केले आहेत. क्वाड देशांच्या बैठकीला अमेरिका नसली तरी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया उपस्थित राहू शकतात, असे अल्बानीज यांनी आधी म्हटले होते. बायडन यांनी दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियाई सरकार उरलेल्या दोन देशांशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले होते.

परंतू, आज त्यांनी माफी मागितली आहे. क्वाडची पुढील आठवड्यातील बैठक रद्द केल्याचे सांगून पुढील तारखा घेत असल्याचे ते म्हणाले. भारत आणि जपानने या बैठकीची तारीख बदलून लवकरात लवकर घेण्यास सांगितली आहे. क्वाड़ बैठक रद्द झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पुढील आठवड्यातील नियोजित द्विपक्षीय बैठक होऊ शकते. यासाठी भारताकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्याचा कार्यक्रम काय?जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी 19 ते 21 मे दरम्यान हिरोशिमा, जपानला भेट देणार आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून ते जपानला भेट देत आहेत. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान जी-7 सत्रांना संबोधित करतील. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह अन्य काही नेत्यांचाही समावेश असणार होता. यानंतर पीएम मोदींचा पापुआ न्यू गिनीला जाण्याचा विचार आहे. यापूर्वी या दौऱ्यातही बायडेन पीएम मोदींसोबत राहण्याची शक्यता होती. मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर मोदी एकटेच पापुआ न्यू गिनीला भेट देऊ शकतात. पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAustraliaआॅस्ट्रेलियाJoe Bidenज्यो बायडन