शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं भारताबाबत पहिलं विधान, घेणार मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 18:14 IST

अमेरिकेतून ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर भारताला मोठा धक्का बसेल अशी अटकळ बांधली जात होती.

ठळक मुद्देअमेरिकेच्या व्हाइट हाऊसकडून महत्वाची माहितीभारतासोबतचे संबंध यापुढील काळात वृद्धींगत होतील असं अमेरिकेचं आश्वासनद्विपक्षीय संबंधांत कोणतीही कमी येणार नाही, अमेरिकेकडून स्पष्ट

अमेरिकेच्या नव्या सरकारने जारी केलेल्या पत्रकामुळे भारतविरोधी असलेल्या चीन आणि पाकिस्तानच्या चिंतेत वाढ होणं आता निश्चित झालं आहे.  अमेरिकेने भारताचा उल्लेख महत्वपूर्ण भागीदारी असल्याचा करत उभय देशांमधील संबंध यापुढील काळात आणखी वृद्धींगत होतील, असं म्हटलं आहे.

अमेरिकेतून ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर भारताला मोठा धक्का बसेल अशी अटकळ बांधली जात होती. पण आता जो बायडन भारतासोबतच्या संबंधांना आणखी उंचीवर घेऊन जाण्यासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची मानली जात आहे. 

जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार

बायडन यांनी अनेकदा केलाय भारत दौराअमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती जो बायडन भारत आणि अमेरिकेतील यशस्वी द्विपक्षीय संबंधांचा सन्मान करतात, असं व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितलं आहे. बायडन यांनी याआधी अनेकदा भारत दौरा केला असून ते आगामी काळात उभय देशांमधील संबंधांना बळकटी आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असंही व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. 

कमला हॅरिस यांच्याबाबत केलं मोठं विधानएका भारतीय वंशाच्या व्यक्तीनं अमेरिकेचं उपराष्ट्रपती होणं हा देशासाठी नक्कीच ऐतिहासिक क्षण आहे आण यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होतील, असं जेन साकी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेतील संबंधं याआधीही चांगले राहिले आहेत ही परंपरा यापुढेही कायम राहील, असंही सांगण्यात आलं आहे. 

केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल?

दरम्यान, जो बायडन हे भारताच्या काही निर्णयांच्या विरोधात असल्याचं वृत्त याआधी प्रसारित करण्यात आलं होतं. तर पाकिस्ताननंही बायडन यांच्यासोबतच्या जुन्या संबंधांचा दाखल देत अमेरिकेतील सत्तांतरण पाकसाठी चांगली गोष्ट ठरणार असल्याचा दावा केला होता. 

बायडन यांच्या टीममध्ये २० भारतीयजो बायडन यांनी आपल्या व्हाइट हाऊसमधील टीममध्ये तब्बल २० भारतीय वंशाच्या व्यक्तींना स्थान दिलं आहे. यातूनच अमेरिकेतील नव्या सरकारचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टीकोन लक्षात येतो. बायडन यांच्या टीममध्ये सहभागी असलेल्या भारतीय वंशाचा नीरा टंडन या अमेरिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहेत. तर माला अडिगा या बायडन यांच्या पत्नीच्या पॉलिसी सल्लागार आहेत. तर सबरीना सिंह या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी अर्थात बायडन यांच्या पत्नीच्या माध्यम सल्लागार आहेत. आयशा शहा यांना सोशल मीडिया आणि मीडिया ब्रिफिंगचं काम देण्यात आलं आहे. भारतीय वंशाच्याच समीरा फाजली या बायडन यांना आर्थिक गोष्टींमध्ये सल्ला देणार आहेत. तर गौतम राघवन हे राष्ट्रपतींसाठीच्या स्टाफची नियुक्त करण्याचं काम पाहणार आहेत. विनय रेड्डी यांच्यावर बायडन यांच्या भाषणाच्या लेखनाची जबाबदारी असणार आहे. यासोबत सोनिया अग्रवाल पर्यावरणाशी संबंधित गोष्टींमध्ये बायडन यांच्या सल्लागार असणार आहेत. अशाप्रकारे बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांचा भरणा आहे.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत