शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बायडेन यांनी बदलले अमेरिकेतील H-1B व्हिसाचे नवे नियम, भारतीयांवर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:51 IST

Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून जाता-जाता व्हिसा प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. मोठ्या संख्येने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर या बदलाचा नक्कीच परिणाम होणार आहे.

Joe Biden, America H1-B Visa Rules Changed : अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. याआधी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाता-जाता एक मोठा बदल केला आहे. बायडेन यांनी H-1B व्हिसासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांचा भारतीय लोकांना खूप फायदा होणार आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या व्हिसा धोरणात केलेली ही शेवटची सुधारणा असेल.

H-1B व्हिसा घेणाऱ्यांमध्ये भारतीयांचा टक्का सर्वाधिक आहे. २०२३ मध्ये दिलेल्या ३ लाख ८६ हजार व्हिसांपैकी ७२ टक्क्यांहून अधिक व्हिसा भारतीयांना देण्यात आले होते. H-1B व्हिसा असलेले लोक त्यांच्या देशात न परतता त्यांच्या व्हिसाचे नूतनीकरण करू शकणार आहेत. त्यामुळे तेथील परदेशी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन नियमांचा भारतीयांवर कसा परिणाम?

  • H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता हा व्हिसा मिळविण्यासाठी कोणत्याही विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमाची गरज भासणार नाही. यामध्ये थेट नोकरीशी संबंधित अशा ऐच्छिक पदवी अभ्यासक्रमांनाही मान्यता देण्यात आली आहे.
  • नवीन नियमांनुसार लॉटरी प्रक्रियेत निष्पक्षता राखली जाईल. त्यासोबतच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जेणेकरून व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना ते सोपे होईल.
  • F-1 व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी H-1B व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.
  • व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर प्रक्रिया वेगवान होणार आहे. जेणेकरून लोकांना लवकर व्हिसा मिळू शकेल.
  • नवीन नियमानुसार, कंपन्या त्यांच्या गरजेनुसार अधिक तज्ज्ञ लोकांना नियुक्त करू शकतील.
  • तपासणीदरम्यान माहितीची पडताळणी न झाल्यासच H-1B व्हिसाचा अर्ज फेटाळला जाऊ शकेल.
  • नियमांचे अधिक चांगल्या प्रकारे पालन करण्यासाठी नवीन तयार केलेला फॉर्म I-129 १७ जानेवारी २०२५ पासून अनिवार्य असेल.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर अनेकदा टीका केली आहे. मात्र, नुकतेच त्यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे एलोन मस्क यांनी या व्हिसाचे कौतुक केले होते. त्यानंतर या व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प यांची भूमिकाही मवाळ झाली. त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर त्यात कोणताही बदल होणार नाही किंवा तो रद्द केला जाणार नाही, असे मानले जात आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतVisaव्हिसा