शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ISIS प्रमुख संपला! अमेरिकन सैन्याने छापा मारताच अबू इब्राहिमने कुटुंबासह स्वत:ला बॉम्बने उडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 10:48 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी ही महत्वाची माहिती दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी इस्लामिक स्टेटचा (ISIS) नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती दिली. बिडेन यांनी सांगितल्यानुसार, अमेरिकेच्या सीरियामध्ये छापेमरीदरम्यान अबू इब्राहिमने कुटुंबासह स्वत:ला बॉम्बने उडवले. सीरियाच्या इदलिब प्रदेशात रात्रीच्या वेळी विशेष सैन्याने केलेल्या छाप्यांमुळे जिहादी गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

बिडेन पुढे म्हणाले, गुरुवारी रात्री झालेल्या ऑपरेशनमध्ये एक प्रमुख दहशतवादी नेता मारला गेला आहे. आमचे सैन्य अबू इब्राहिमला पकडण्यासाठी त्याच्या ठिकाणाजवळ जात होते, पण त्यापूर्वीच त्याने भ्याडपणे स्वतःसह कुटुंबाला बॉम्बने उडवले. यावेळी त्याने स्वतःसह आपल्या कुटुंबाच्या किंवा इतर लोकांच्या जीवाची पर्वा केली नाही. 

बिडेन पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या या ऑपरेशनने जगभरातील दहशतवाद्यांना एक मजबूत संदेश गेला आहे. मी अमेरिकन लोकांना दहशतवादी धोक्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या देशाच्या संरक्षणासाठी मी समर्थ आहे. दहशतवाद्यांविरोधत लढण्यासाठी अमेरिकन सैन्य सदैव सतर्क आणि सज्ज असेल, असे बिडे म्हणाले. यापूर्वी अबू बकर अल-बगदादीदेखील 2019 मध्ये अशाच एका कारवाईत मारला गेला होता.

 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाISISइसिसterroristदहशतवादी