शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जपान अंतराळात एलिवेटर वापरण्याच्या प्रयत्नात; पुढील आठवड्यात होणार प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 12:07 IST

जगातील कोणत्याही देशानं आतापर्यंत अंतराळात एलिवेटर वापरलेलं नाही

टोकियो: जपानचे शास्त्रज्ञ अंतराळात लिफ्ट वापरण्याच्या प्रयत्नात आहे. हा प्रयोग याच महिन्यात केला जाऊ शकतो. शिंजोका विद्यापीठाचा संशोधन विभागाकडून सध्या यावर काम सुरू आहे. विद्यापीठाच्या टीमकडून सध्या या प्रयोगासाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती सुरू आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था तानेंगशिमा पुढील आठवड्यात यासाठी एच-2बी रॉकेटचं प्रक्षेपण करु शकते. लवकरच जपानकडून अवकाशात लिफ्ट (स्पेस एलिवेटर) वापरण्याचा प्रयोग केला जाईल. यासाठी एक बॉक्स वापरण्यात येईल. हा बॉक्स 6 सेंटिमीटर लांब, 2 सेंटिमीटर रुंद आणि 3 सेंटिमीटर उंच असेल. जर सर्व काही योग्यपणे झाले, तर अंतराळातील दोन उपग्रह 10 मीटरच्या केबलने जोडण्यात येतील. हे दोन्ही उपग्रह एकमेकांच्या व्यवस्थित संपर्कात असतील, याची काळजी घेतली जाईल. हा जगातील पहिलाच प्रयोग असेल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी दिली. एलिवेटर बॉक्स व्यवस्थिपणे मार्गक्रमण करत आहे की नाही, हे पाहण्यासाठी दोन्ही उपग्रहांमध्ये कॅमेरे लावले जातील. अंतराळात एलिवेटरचा वापर करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल असेल. अंतराळात लिफ्ट वापरली जाऊ शकते, ही कल्पना सर्वप्रथम रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टानटिन तॉसिलकोवास्की यांना 1895 मध्ये सुचली. पॅरिसमधील आयफेल टॉवर पाहून त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली. यानंतर जवळपास एका शतकानंतर ऑर्थर सी. क्लार्क यांनी त्यांच्या एका पुस्तकात याबद्दलचे विचार मांडले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या दृष्टीने कोणतीही प्रगती झाली नाही. 

टॅग्स :Japanजपानtechnologyतंत्रज्ञान