शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जपानचे सम्राट अखिहितो करणार पदत्याग, राजघराण्यातील दोनशे वर्षांतील पहिलीच निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:43 IST

जपानचे राजे अखिहितो यांनी  30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ 200 वर्षांनंतर येत आहे.

ठळक मुद्देजपानच्या राजाकडे नाममात्र अधिकार असतात. परदेशी राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करणे वगैरे असे थोडेच अधिकार त्यांच्याकडे असतात.

टोकियो- जपानचे राजे अखिहितो यांनी  30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ 200 वर्षांनंतर येत आहे. तब्येतीच्या कारणामुळे 83 वर्षिय अखिहितो यांनी हा निर्णय घेतला असून त्यापुर्वी त्यांनी इम्पिरियल कौन्सीलशी चर्चाही केली आहे. 

आता हा निवृत्तीचा समारोह आणि नव्या राजाचे आगमन हे दोन्ही सोहळे जपानी जनता अत्यंत आनंदात साजरे करतील असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी स्पष्ट केले आहे. अखिहितो यांचे ज्येष्ठ पुत्र राजपुत्र नारुहितो आता राजगादीवर बसतील असे सांगण्यात येत आहे. नारुहितो हे 57 वर्षांचे आहेत. सुमारे 30 वर्षे राजसत्तेवरुन काम केल्यावर अखिहितो यांनी गेल्या वर्षी तब्येतीचे व वाढत्या वयाचे कारण सांगून निवृत्तीचे संकेत दिले होते, तेव्हाच जपानी जनतेला मोठा धक्का बसला होता.जपानच्या राजघराण्याच्या इतिहासामध्ये पदत्याग करण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण गेल्या 200 वर्षांमध्ये कोणत्याही राजाने पदत्याग केलेला नव्हता. जपानच्या राजघराण्याला 2600 वर्षांचा इतिहास आहे. जून महिन्यात जपानी संसदेने राजाला पदाचा त्याग करण्याची परवानगी देणार ठराव मंजूर केला होता. अखिहितो यांच्यावर कर्करोगासाठी उपचार सुरु आहेत त्याचप्रमाणे त्यांची हृदयशस्त्रक्रीयाही झाली आहे.  जपानचे याआधीचे सम्राट हिरोहितो आणि त्यांची पत्नी नागाको यांच्या पोटी अखिहितो यांचा 1933 साली जन्म झाला. आता अखिहितो यांच्यानंतर जे नारुहितो राजगादीवर येतील त्यांना केवळ एकच मुलगी आहे. जपानच्या राजगादीवर केवळ पुरुषांनाच बसता येते. त्यामुळे नारुहितो यांच्यानंतर त्यांचे बंधू फुमुहितो यांचा मुलगा हिसाहितो राजगादीवर येईल.

 

टॅग्स :Japanजपान