शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एक मिनिट उशीर झाला म्हणून पगार कापला; 'त्याने' बॉस विरोधात उचललं टोकाचं पाऊल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 16:26 IST

One minute late company cuts driver salary : एक मिनिट उशीर झाला म्हणून बॉसने पगार कापल्याची घटना घडली.

जपानची ट्रेन सिस्टम ही आपल्या अचूक वेळेसाठी जगभरात खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ट्रेन लेट होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. एक मिनिट जरी ट्रेनला उशीर झाला तर तिथे तो चर्चेचा विषय ठरतो. अशातच आता आणखी एक घटना घडली आहे. एक मिनिट उशीर झाला म्हणून बॉसने पगार कापल्याची घटना घडली. पगारातून 56 पाउंड म्हणजेत जवळपास 5 हजार रुपये कापण्याचा आदेश देण्यात आला आहे. यानंतर आता ट्रेनचा ड्रायव्हर चांगलाच संतापला असून त्याने कोर्टात धाव घेतली आहे. तसेच 14,300 पाउंड म्हणजेच 14 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ड्रायव्हर गेल्या वर्षी 18 जून रोजी ओकायामा या स्टेशनवर एक रिकामी ट्रेन घेऊन जाण्यासाठी आला होता. मात्र त्याचवेळी अचानक त्याच्या पोटात दुखू लागलं आणि तो बाथरुममध्ये गेला. त्याच दरम्यान त्याने आपल्या एका ज्युनिअर ड्रायव्हरला आपलं काम करण्यास सांगितलं. त्यामुळे ती ट्रेन चुकीच्या प्लॅटफॉर्मवर गेली. त्याचमुळे ट्रेनला एक मिनिट उशीर झाला. या कारणामुळे जपानच्या रेल्वे कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारामधील 5600 रुपये कापून घेतले. 

कापलेल्या पगारासाठी नुकसान भरपाईची मागणी

कंपनीच्या या निर्णयाविरोधात ड्रायव्हर ओकायामा लेबर स्टँडर्ड इन्स्पेक्शन ऑफिस येथे पोहोचला. तिथे कंपनीने त्याचा पगार कमी कापला. पण कर्मचारी हे ऐकण्यास तयार नव्हता. त्याला पगार कापणंच मान्य नव्हतं. त्यामुळे त्याने याला नकार दिला. त्याने पुढे ओकायामाच्या जिल्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच एक मिनिटाचा उशीर झाला म्हणून कापलेल्या पगाराबाबत त्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. आपलं काम, कापलेला पगार, मानसिक त्रास, नोकरी अशा गोष्टींचा उल्लेख करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 

एका छोट्याशा चुकीची मोठी शिक्षा

कंपनीकडे कर्मचाऱ्याने तब्बल 14 लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. कंपनीने पगार कापला त्याबाबत 'काम नाही तर वेतन नाही' या सिद्धांताचा दाखला दिला आहे. याउलट ड्रायव्हरने कंपनीवरच काही आरोप केले आहेत. तसेच एका छोट्याशा चुकीची मोठी शिक्षा दिली आहे. खरं तर याला नियमांचं उल्लंघन म्हटलं जात नाही असं म्हटलं आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. जपानमधील अनेक लोकांनी ड्रायव्हरची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Japanजपान