शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: खबरदार, मुलांची नावं अवघड ठेवाल तर!..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 06:51 IST

मुलांचं बारसं हा सगळ्यांसाठीच, विशेषत: पालकांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. आपल्याला मुलगा होवो अथवा मुलगी, पालकांनी आपल्या बाळांची संभाव्य ...

मुलांचं बारसं हा सगळ्यांसाठीच, विशेषत: पालकांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. आपल्याला मुलगा होवो अथवा मुलगी, पालकांनी आपल्या बाळांची संभाव्य नावं बऱ्याच आधी ठरवून ठेवलेली असतात. मुलगा झाला तर हे नाव ठेवू किंवा मुलगी झाली तर हे नाव ठेवू. बऱ्याच जणांनी तर आपल्या आवडीच्या नावांची लिस्टच तयार करून ठेवलेली असते. बाळ झाल्यावर यातलंच एखादं नाव फिक्स करू म्हणून.जपान सरकारनं मात्र नुकताच एक नवा नियम आणला आहे. आपल्या मुलांची नावं ठेवण्याचा अधिकार तर त्यांना आहे, पण ‘कोणतीही’ नावं त्यांना ठेवता येणार नाहीत. मुलांची चित्रविचित्र नावं ठेवण्यावर त्यांनी आता रोक आणली आहे आणि त्यासंदर्भाचे नियम अधिक कठोर केले आहेत. 

जपान सरकारचं म्हणणं आहे, आजकाल पालक मुलांची नावं इतकी चित्रविचित्र ठेवतात की त्यांचा साधा उच्चारसुद्धा करता येत नाही किंवा ती नावं कशी लिहायची, वाचायची हे सुद्धा कळत नाही. नव्या नियमानुसार आता पालक आपल्या मुलांची जी नावं ठेवतील, त्या नावांचं योग्य उच्चारणही सोबत द्यावं लागेल. जी नावं उच्चारता येत नाहीत किंवा त्यांचा उच्चार कळत नाही, अशी नावं स्वीकारली जाणार नाहीत. ती एक तर रद्द केली जातील किंवा त्यासाठी आणखी काही कागदपत्रांची मागणी केली जाईल.

जपानमध्ये, बाळांची नावं बव्हंशी चिनी लिपीवर आधारित वर्णात लिहिली जातात. या लिपीचं वैशिष्ट्य म्हणजे एकेका अक्षराचे अनेक उच्चार होऊ शकतात. त्यामुळे त्याचा नेमका उच्चार कसा करायचा हेच बऱ्याचदा लक्षात येत नाही. त्यामुळे नावांचं उच्चारण तर चुकीचं होतंच, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं त्याचा उच्चार करतो, ते मूल मोठं झाल्यावर त्यालाही त्याचा त्रास होतो, आपल्या नावाची त्याला लाज वाटू शकते, इतर मुलांकडून त्याला चिडवलं जाऊ शकतं, कागदोपत्री गडबड होते. हा सगळा गोंधळ दूर करण्यासाठी जपान सरकारनं आता मुलांच्या चित्रविचित्र नावांवर बंदी आणली आहे. 

पालक बऱ्याचदा मुलांच्या नावांचा ध्वनी लक्षात घेतात. जो ध्वनी त्यांच्या कानांना चांगला वाटतो, मुलांचं तसंच नाव ठेवून ते मोकळे होतात; पण शाळेत, रुग्णालयात, बँकेत, सरकारी कार्यालयांत या नावांवरून बराच गोंधळ होतो. नर्सला समजत नाही, या बाळाला कोणत्या नावानं हाक मारावं, शिक्षकाला कळत नाही, याची हजेरी कशी घ्यायची, कर्मचाऱ्यांना कळत नाही, हे नाव नेमकं कसं लिहायचं, हा गोंधळ बराच वाढत चालला होता. तो कमी करण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलणं आवश्यक वाटलं. 

काही पालकांनी आपल्या मुलांची नावं पिकाचू, पुडिंग आणि आणखीही चित्रविचित्र ठेवली आहेत; पण सरकारच्या या नियमावरूनही जपानमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर तर अक्षरश: तुफान आलं आहे. अनेकांचं म्हणणं आहे, मुलांचं नाव काय ठेवायचं, हा संपूर्णत: पालकांचा अधिकार आहे. सरकारनं त्यात नाक खुपसू नये. मुलं पालकांची आहेत, सरकारची नाहीत, त्यामुळे सरकारनं त्यांच्या अधिकारांवर आक्रमण करू नये. काही जणांचं म्हणणं आहे, सरकारचं बरोबर आहे. यामुळे जर भविष्यात त्या मुलांनाच त्रास होणार असेल, तर आत्ताच त्याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी! 

टॅग्स :JapanजपानInternationalआंतरराष्ट्रीय