शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिंजो अबेंचा खून ५ कोटी रुपयांसाठी! जपानच्या माजी पंतप्रधानांच्या हत्याकांड प्रकरणात नवा खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:28 IST

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. जपानच्या सत्ताधारी पक्षाशी जवळचे संबंध असलेल्या युनिफिकेशन चर्चनं दिलेल्या माहितीवरून या हत्येमागील कारणं समोर येत आहेत.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. जपानच्या सत्ताधारी पक्षाशी जवळचे संबंध असलेल्या युनिफिकेशन चर्चनं दिलेल्या माहितीवरून या हत्येमागील कारणं समोर येत आहेत. चर्चने कबूल केलं आहे की ज्या व्यक्तीनं शिंजो आबे यांना मारलं त्याच्या आईनं गरजेपेक्षा जास्त आर्थिक मदत देऊ केली होती. त्यामुळे मुलानं अबे यांची हत्या केली हे संभाव्य कारण असू शकतं. 

दोन महिन्यांपूर्वी ८ जुलै रोजी शिंजो अबे जपानमधील नारा येथे एका रॅलीला संबोधित करत होते. त्याच वेळी ४१ वर्षीय तेत्सुया यामागामी यानं त्यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या केली. त्यासाठी त्यांनी घरीच बंदूक तयार केली होती. त्याच्या कबुली जबाबानुसार युनिफिकेशन चर्चशी संबंध ठेवल्यामुळे अबे यांची हत्या केली. या चर्चला जपानमध्ये मूनीज असंही म्हणतात. चर्चमुळे त्यांचं कुटुंब दिवाळखोरीत निघाल्याचं आरोपीनं सांगितलं. यामागामीची आई बऱ्याच काळापासून या चर्चची सदस्य आहे.

दोन दशकात दिली इतकी वर्गणीगेल्या दोन दशकांत आरोपीच्या आईनं 100 मिलियन येन (सुमारे साडेपाच कोटी रुपये) चर्चला दान केले होते. एवढंच नाही तर त्यांनी आपला आयुर्विमा आणि जमीनही दान केली. मात्र, संशयिताच्या काकांच्या सांगण्यावरून अर्धी मालमत्ता परत केल्याचं चर्चचं म्हणणे आहे. या कारणामुळे त्यांचं कुटुंब गरिबीच्या खाईत लोटलं गेलं. चर्चचं वरिष्ठ अधिकारी हिदेयुकी तेशिगवारा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यामागामी याने पोलिसांना जे सांगितलं त्यामुळे ते खूप दुःखी झाले आहेत. यामागामीने पोलिसांना सांगितले की त्याला चर्चचा राग होता. चर्चमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा देणग्या जबरदस्तीने घेतल्या जाणार नाहीत याची ते आता खात्री करत आहेत. अनुयायी किंवा कुटुंबीयांच्या दबावाशिवाय दान केले पाहिजे. शिंजो अबे यांचेही या चर्चशी जवळचे संबंध होते. 

चर्चपासून स्वत:ला दूर ठेवतंय सरकारजपानमध्ये पक्षाच्या सर्वेक्षणातून निम्म्याहून अधिक खासदार आणि मंत्र्यांचे चर्चशी संबंध असल्याचे समोर आलं आहे. शिंजो अबे यांच्या हत्येनंतर सध्याचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शपथ घेतली आहे की त्यांचं सरकार चर्चशी असलेले सर्व संबंध तोडेल. पण राजकीय पक्षांची या चर्चशी इतकी जवळीक का आहे हे जपानमधील सर्वसामान्यांना जाणून घ्यायचं आहे. 

1954 साली चर्चची स्थापना युनिफिकेशन चर्चची स्थापना प्रथम 1954 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली. एका दशकानंतर ते जपानमध्ये दाखल झाले. ही मंडळी साम्यवादाच्या विरोधात होती. हे चर्चही बरेच वादात सापडलेलं आहे. जपानमधील नागरिकांनी अनेकदा याला विरोध केला आहे.

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेJapanजपान