शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पेपर’ नावाचा रोबोट घेणार कोरोना रुग्णांची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 14:37 IST

टोक्यो शहरात 5 हॉटेल्स सरकारने ताब्यात घेतले असून तिथं कृत्रिम बुदिमत्ता असलेले रोबोट रुग्णसेवेत दाखल आहेत.

ठळक मुद्देयंत्र माणसांचं जगणं सोपं करतात, याचं हे एक आणखी पुढचं पाऊल आहे, संकटकाळातलं.

कोरोना व्हायरसने शिस्तप्रिय जपानी समाजालाही घेरलंच. आजच्या घडीला जपानमध्ये 15,556 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 585 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. जपानच्या लोकसंख्येत तरुणांपेक्षा ज्येष्ठांचे प्रमाण जास्त असल्याने तिथं खबरदारीही अधिक घेतली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून टोक्यो शहरात एक उपक्रम सुरु करण्यात आला.ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, पण त्यांना संसर्ग झालेला आहे असे रुग्ण आणि ज्यांच्या मध्यम लक्षणं आहेत अशा रुग्णांना दवाखान्यात न ठेवता हॉटेल्समध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.दवाखान्यांवरचा वाढता ताण कमी करणं आणि ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करणं असा यामागचा हेतू.त्यासाठी टोक्यो शहरात 5 हॉटेल्स मिळून दहा हजार हॉटेल रुम्स सरकारने ताब्यात घेतल्या असून तिथं रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दोन नर्स आणि एका डॉक्टरचीही नेमणूक करण्यात येईल.मात्र या रुग्णांची त्या हॉटेल्समध्ये काळजी घ्यायला ‘रोबोट’ची नियुक्ती करण्यात आली आहे.‘पेपर’ असं या रोबोटचं नाव.तो या हॉटेलमधल्या रुग्णांच्या दिमतीला पांढरा सर्जिकल मास्क लावून हजर आहे.सॉफ्टबॅँक रोबोटिक्स नावाच्या कंपनीने बनवलेला हा रोबोट अनेक प्रकारची कामं करणार आहे.म्हणजे तो टॉकिंग रोबोट आहे. तो स्वागत कक्षात रुग्णांचं स्वागत करेल.त्यांना सांगेल, की मास्क निट लावा. ताप किती तपासला का, तो नोंदवून घ्या. मग गप्पाही मारेल की, काळजी करू नका, लवकर बरे व्हाल.क्लिनिंग रोबोट म्हणूनही काम करेल, या रुग्णांच्या खोल्यांसह ते ज्या भागात राहतील त्या भागात सफाईचं काम रोबोट करेल.डायनिंग एरियात  मदत करायला हजर राहील.

आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन हा रोबोट प्रत्येक रुग्णाची काळजी घेईल, त्याच्याकडे रुग्णाची सारी माहितीही असेल.रेड झोनमध्ये अधिकाधिक हे रोबोट वापरण्याचा जपान सरकारचा मानस आहे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रतील  मनुष्यबळावरचा ताण आणि त्यांना असलेला संसर्ग धोका कमी होईल.टोक्योतल्या एका हॉटेलात या पेपर रोबोटने टोक्यो गव्हर्नर  युरीको कोईके यांचं स्वागत केलं. आणि कामाला सुरुवात केली.यंत्र माणसांचं जगणं सोपं करतात, याचं हे एक आणखी पुढचं पाऊल आहे, संकटकाळातलं.