शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 09:06 IST

पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल, अशीही पाकिस्तानला सतावते आहे.

काबूल: पाकव्याप्त काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. भारतानं गिलगिल-बाल्टिस्तान प्रदेशाच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम भारताविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल, अशीही पाकिस्तानला सतावते आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून तालिबान्यांनीची पाकिस्तानचे कान टोचले आहेत.तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद सुरू असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत मुद्द्यात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचंही तालिबाननं सांगितलं आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या ट्रोल सेनेने ट्विटरवर एक निवेदन सामायिक करून काश्मीरमधील सध्या सुरू असलेल्या दहशतवादामध्ये तालिबान सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. तालिबानच्या वक्तव्यानंतर आता पाकिस्तान पुरता तोंडावर आपटला आहे.  तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ट्विट करत म्हटले की, " तालिबानी काश्मीरमधील जिहादमध्ये सामील होत असल्याची माध्यमांत प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे." इस्लामिक अमिरात (तालिबान)चे धोरण स्पष्ट आहे की, ते इतर कोणत्याही देशाच्या अंतर्गत मुद्द्यात हस्तक्षेप करत नाहीत. ' यापूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बर्‍याच ट्विटर हँडलद्वारे असा दावा केला जात होता की, तालिबान काश्मीरमधील दहशतवादात सामील होणार आहे.तालिबानी प्रवक्ता जबुल्ला मुजाहिदचा संदर्भ देत हा दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर तालिबानचे प्रवक्ते सुहेल यांनी स्पष्टीकरण देत संपूर्ण प्रकरणापासून स्वत: ला दूर केले आहे. सोशल मीडियामध्ये अफवा पसरवल्यानंतर भारतीय मोठ्या राजकीय नेत्यांनी पडद्यामागून या बातमीची सत्यता तपासली आहे. भारत अफगाणिस्तानमधल्या देशद्रोह्यांना नेहमीच मदत करत असल्याचा गंभीर आरोपही यापूर्वी तालिबान्यांनी केला होता. तालिबानचे मुख्य नेते शेर मुहम्मद अब्बास स्टानिकाजी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'अफगाणिस्तानात भारताने नेहमीच नकारात्मक भूमिका घेतली आहे. भारताने देशातील गद्दारांना मदत केली आहे. या मुलाखतीची खातरजमा इन्स्टिट्यूट ऑफ करंट वर्ल्ड अफेयर्सचे माजी संचालक हशिम वहाडियार यांनी केली आहे. वहाडियार 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान