शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी सरकारनं जॅक मा यांना 'गायब' का केलं?; धक्कादायक माहिती समोर

By कुणाल गवाणकर | Updated: January 6, 2021 12:54 IST

Jack Ma Missing: अलिबाबाचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता

बीजिंग: चीनमधील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेले जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. अलिबाबा समूहाचे संस्थापक असलेले जॅक मा नेमके कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय, असे प्रश्न जगभरातून विचारले जात आहेत. मात्र अद्याप तरी यावर चीन सरकारनं भाष्य केलेलं नाही. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण काय, असा प्रश्न सगळ्यांना पडला असताना अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नलनं एक महत्त्वाचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.जॅक मा कुठे आहेत? चीनच्या सरकारी वृत्तपत्राचा मोठा खुलासा; सांगितला ठावठिकाणाअलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचं मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठं आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारला हीच माहिती मा यांच्याकडून हवी आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मा यांनी अशा प्रकारचा तपशील देण्यास विरोध केला आहे. जॅक मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे.अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि जॅक मा यांचं नक्की काय बिनसलं आहे ?वित्तीय नियामक संस्थेपाठोपाठ चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडूनही जॅक मा यांच्यावर ग्राहकांच्या तपशीलासाठी बराच दबाव आणला गेला. त्यामुळे मा यांच्याकडे अतिशय कमी पर्याय शिल्लक राहिले होते. 'मा यांचं संपूर्ण लक्ष व्यवसाय वृद्धीकडे आहे. वित्तीय धोक्याच्या नियंत्रणाकडे त्यांचं फारसं लक्ष नाही. वित्तीय धोका कमी करणं देशाचं लक्ष्य आहे. मात्र याकडे मा यांचं दुर्लक्ष झालं आहे,' अशी माहिती वॉल स्ट्रिट जर्नलनं चिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे.एंट समूह ग्राहकांच्या वैयक्तिक तपशीलाचा व्यवसायात गैरवापर करत असल्याचा चीनच्या आर्थिक नियामक संस्थेचा दावा आहे. जॅक मा त्यांच्या अलीपे ऍपच्या मदतीनं लोकांना व्याज देतात. या माध्यमातून मध्यस्थ म्हणून मा यांच्या कंपनीला फायदा मिळतो. मात्र सगळी जोखीम बँकांना पत्करावी लागते. जवळपास ५० कोटी लोक या ऍपचा वापर करतात. या व्यक्तींच्या सवयी, उधार घेण्याची वृत्ती आणि कर्जाची परतफेड या संदर्भातील संपूर्ण तपशील जॅक मा यांच्याकडे आहे.

टॅग्स :Jack Maजॅक माchinaचीन