शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 17:14 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पुढील महिन्यात भारतात येणार असल्याचंही इवांका यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

नवी दिल्ली-  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच पुढील महिन्यात भारतात येणार असल्याचंही इवांका यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी इवांका ट्रम्प यांना जागतिक उद्योजगता परिषदेचं नेतृत्व भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच निमंत्रणानुसार नोव्हेंबर महिन्यात इवांका ट्रम्प भारतात येणार आहेत. पुढील महिन्यात हैदराबादमध्ये ही परिषद होणार आहे.

सर्व हिंदू, शीख, जैन तसंच जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. पुढील महिन्यातील भारत दौऱ्याची वाट पाहते आहे, असं इवांका ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 

दोन दिवसांपूर्वीचं इवांका ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती.  अमेरिकी सरकार व प्रशासनातील भारतीय वंशाचे, तसेच भारतीय प्रतिनिधी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. ट्रम्प यांची कन्या इवांका हीदेखील दिवाळी समारंभात सहभागी झाली होती. समारंभाचा भाग म्हणून ट्रम्प यांनी दीप प्रज्वलनही केले.

अमेरिकेच्या विकासात भारतीयांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी या वेळी केला. स्वत: ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील दिवाळीची पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली. दिवाळी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे आणि आमच्यासाठी दिवाळी हा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताविषयी आणि भारतीयांविषयीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिमानास्पद क्षण आहे.

भारतीय वंशाचे नेते व प्रशासनातील अधिकारी यांच्यासह हा प्रकाशाचा सण साजरा करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला आहे. 

बुशपासून परंपरा सुरूव्हाइट हाउसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्याची परंपरा अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सुरू केली होती. त्यानंतरच्या अध्यक्षांनी ती कायम ठेवली. या आधी बराक ओबामा यांनीही व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली होती. त्या निमित्ताने ते अनेक भारतीयांना भेटलेही होते.

‘मुबारक’ शब्दावरून टीकाभारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी संख्या असलेल्या कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी ओटावा शहरात भारतीय समाजासोबत दिवाळी साजरी केली. याचा फोटो शुभेच्छांसह टिष्ट्वटरवर टाकला. मात्र, यात ‘दिवाळी मुबारक’ असा शब्दप्रयोग केल्याबद्दल त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाdiwaliदिवाळी