शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:36 IST

या देशात सूर्योदय सकाळी ६ वाजता नाही तर दुपारी १२ वाजता होतो. वर्षात १३ महिने असतात, १२ महिने नाहीत आणि वर्ष २०२५ नाही तर २०१८ आहे. हा देश आफ्रिकन खंडातील इथिओपिया आहे. याच इथिओपियामध्ये १२,००० वर्षांनी एक ज्वालामुखी सक्रिय झाला आहे आणि त्याची राख दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.

इथिओपियाच्या अफार प्रदेशात १२,००० वर्षांनंतर  ज्वालामुखी खवळला आहे. आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान, राख आणि धुराचे दाट ढग १४ किलोमीटर उंचीपर्यंत उठले. ही राख आणि धूर सर्वत्र पसरत आहे. या ज्वालामुखीमुळे आता पुन्हा एकदा इथिओपिया हा देश चर्चेत आला आहे.

 हा देश पूर्व आफ्रिकेच्या हॉर्नमध्ये, लाल समुद्राच्या नैऋत्येस, इरिट्रिया, जिबूती, सोमालिया, केनिया आणि दक्षिण सुदानने वेढलेला एक प्राचीन देश आहे. हा आफ्रिकेतील एकमेव देश आहे जो कधीही युरोपने वसाहत केलेला नाही आणि त्यांच्या ३,००० वर्ष जुन्या संस्कृतीचा अभिमान आहे. 

12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये

इथिओपियन समाज अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. येथे ८० हून अधिक वांशिक गट राहतात, प्रत्येकाची स्वतःची भाषा आणि संस्कृती आहे. ६०% पेक्षा जास्त लोकसंख्या ईसाई (इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्च) आहे, ही जगातील सर्वात जुन्या ख्रिश्चन समुदायांपैकी एक आहे. या देशात वर्षाचे १३ महिने आहेत, यामध्ये १३ वा महिना पाच दिवसांचा असतो.

असे का असते?

इथिओपिया हा असा देश आहे, जिथे आधुनिक जग वेगाने बदलत असताना वेळ मात्र जणू थांबलेली आहे. प्राचीन संस्कृती, जपलेली परंपरा आणि जगाच्या इतर भागांच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने जगणारी जीवनशैली आजही तिथे आहे.

इथिओपियाने जाणीवपूर्वक आपली प्राचीन ओळख, वेळेचे नियोजन, कॅलेंडर आणि जीवनशैली जपली आहे. स्वतःचे कॅलेंडर पाळणारा इथोपिया हा एकमेव देश आहे. हा देश  येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून ७-८ वर्षे मागे आहे. या कॅलेंडरला गीझ कॅलेंडर असे म्हणतात. येथे सध्या २०१८ आहे, २०२५ नाही. कारण गीझ कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ७-८ वर्षे मागे आहे.

हे कॅलेंडर प्राचीन इजिप्शियन कॉप्टिक कॅलेंडरवरून घेतले आहे, हे ख्रिश्चन चर्चने स्वीकारले होते. इथिओपियाने कधीही युरोपियन वसाहतवाद स्वीकारला नाही, म्हणून त्यांची संस्कृती, लेखन, चर्च संगीत आणि पाककृतींवर फारसा पाश्चात्य प्रभाव पडला नाही. इथिओपियाने ख्रिश्चन चर्चकडून कॅलेंडर स्वीकारले आणि त्याला गीझ कॅलेंडर म्हटले. इथिओपियाशिवाय, इरिट्रिया हा एकमेव देश आहे या देशात अजूनही या कॅलेंडरला अधिकृतपणे मान्यता देतो.

प्रत्येकी ३० दिवसांचे बारा महिने, ५ दिवसांचा तेरावा महिना

इथियोपियामध्ये, प्रत्येक महिना अगदी ३० दिवसांचा असतो. म्हणजे १२ महिने × ३० दिवस = ३६० दिवस. उर्वरित ५ दिवस एका वेगळ्या लहान महिन्यात जोडले जातात, याला पागुमेन म्हणतात. लीप वर्षात, इथियोपियामध्ये १३ वा महिना ६ दिवसांचा असतो. यामुळे यागन एकूण १३ महिने बनतो. हे कॅलेंडर पूर्णपणे सौर-आधारित आहे. दर ४ वर्षांनी, एक लीप दिवस येतो, यामुळे १३ वा महिना ६ दिवसांचा होतो. 

ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ७-८ वर्षे मागे

आपण भारतीय २०२५ मध्ये आहे, पण इथिओपियामध्ये सध्या २०१८ सुरू आहे, कारण इथिओपियन गीझ कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ७-८ वर्षे मागे आहे. इथिओपियन नवीन वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू होते, जसे आपण करतो. ते त्याला मेस्केरेम म्हणतात, याचा अर्थ "फुलांचा महिना" आहे. इथिओपियन नवीन वर्ष सहसा ११ किंवा १२ सप्टेंबर रोजी साजरे केले जाते.

इथिओपियामध्ये सूर्योदय सकाळी ६ वाजता नाही तर १२ वाजता होतो. याचा अर्थ वेळ मध्यरात्री नव्हे तर सूर्योदयापासून मोजली जाते. याला इथिओपियन वेळ म्हणतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ethiopia: Volcano erupts, follows unique calendar, sunrise at noon.

Web Summary : Ethiopia, untouched by European colonization, boasts a unique 13-month calendar, currently at 2018. A recent volcanic eruption in the Afar region spewed ash 14 km high. Sunrise is reckoned at 12 pm, marking the start of the day.
टॅग्स :Volcanoज्वालामुखी