शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

वैध B1/B2 व्हिसावर अमेरिकेत बिझनेस करण्याची परवानगी असते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 16:18 IST

B1/B2 व्हिसावर प्रवास करणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत रोजगार मिळवण्याची परवानगी आहे. मात्र ही परवानगी काही मर्यादित आणि विशिष्ट व्यवसाय करण्यासाठीच आहे.

प्रश्न: माझ्याकडे वैध B1/B2 व्हिसा आहे. मी अमेरिकेत जाऊन तिथे काहीतरी बिझनेस करावा, असं माझ्या कंपनीला वाटतं. याला परवानगी आहे का?उत्तर: तुम्हाला कोणता बिझनेस करायचा यावर प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. B1/B2 व्हिसावर प्रवास करणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत रोजगार मिळवण्याची परवानगी आहे. मात्र ही परवानगी काही मर्यादित आणि विशिष्ट व्यवसाय करण्यासाठीच आहे.अमेरिकन इमिग्रेशन कायद्यानुसार बऱ्याचशा व्यवसायिक कृती मुख्यत: दोन प्रकारात मोडतात: श्रम आणि प्रासंगिक काम. सामान्यपणे B1/B2 व्हिसा वापरून श्रमाशी संबंधित कृती करण्यास परवानगी नाही. मात्र प्रासंगिक कार्य करण्यास मुभा आहे. तुम्ही दररोज करत असलेलं काम, नोकरीतलं मुख्य कार्य श्रम प्रकारात मोडतं. उदाहरणार्थ, तुम्ही शेफ असाल, तर तुम्हाला अमेरिकेत असताना B1/B2 व्हिसावर काम करण्याची परवानगी नाही. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनीयर असाल, तर अमेरिकेत असताना तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकत नाही. प्रासंगिक कामाचा विचार केल्यास त्यामध्ये तुमचं मूळ कौशल्य वापरलं जात नाही. उदाहरणार्थ, व्यवसायिक परिषदेत किंवा एक्स्पोमध्ये सहभागी होणं. अमेरिकेत प्रवास करताना B1/B2 व्हिसाच्या आधारे तुम्ही प्रासंगिक कामं करू शकता.तुमचं काम श्रम प्रकारात मोडतं की प्रासंगिक कार्यात हे ठरवणं अवघड असू शकतं. त्यासाठी हे उदाहरण उपयोगी ठरेल. कस्टम क्लोथिंगमध्ये स्पेशलायझेशन असलेला टेलर B1/B2 व्हिसावर अमेरिकेत प्रवास करत असल्यास त्यानं ग्राहकांचं मोजमाप घेतल्यास ते प्रासंगिक कार्य ठरतं. हा व्हिसाचा योग्य वापर ठरतो. पण त्याच टेलरनं प्रवासादरम्यान ग्राहकासाठी नवे कपडे शिवल्यास त्यामुळे अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्याचा भंग होतो. त्यामुळे त्याला भविष्यात अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखलं जाऊ शकतं.थोडक्यात तुमची कंपनी कुशल किंवा अकुशल कामांसाठी तुम्हाला अमेरिकेत पाठवत असल्यास त्यासाठी B1/B2 व्हिसा अयोग्य आहे. त्यामुळे तुमच्या कंपनीनं H1B किंवा L सारख्या व्हिसाचा वापर करावा असं आम्ही तुम्हाला सुचवतो. तुमची कंपनी तुम्हाला पुरवठादारांना भेटण्यासाठी, ट्रेड एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा इतर कोणतंही प्रासंगिक काम करण्यासाठी अमेरिकेत पाठवत असल्यास B1/B2 व्हिसा योग्य आहे.तुमचा प्रवासाचा हेतू लक्षात घेता तुमच्यासाठी कोणता व्हिसा योग्य आहे, याबद्दल साशंकता असल्यास https://www.ustraveldocs.com/in/nonimmigrant-visa.html वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.तुम्हाला काही विशिष्ट प्रश्न, शंका असल्यास तुम्ही support-india@ustraveldocs.com वर मेल करू शकता.सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :Visaव्हिसाAmericaअमेरिका