शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अमेरिकेत कुटुंब असणं गरजेचं असतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 10:00 AM

प्रश्न- एखाद्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळवायचं असल्यास त्याचं कुटुंब अमेरिकेत असायला हवं, असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का?

प्रश्न- एखाद्या व्यक्तीला ग्रीन कार्ड मिळवायचं असल्यास त्याचं कुटुंब अमेरिकेत असायला हवं, असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का?उत्तर- नाही. इमिग्रंट विसासाठी पात्र ठरणारे बहुतांश जण त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळाल्यावर किंवा त्यांचं कुटुंब अमेरिकेत वास्तव्यात असल्यावर ग्रीन कार्डसाठी अर्ज करतात. मात्र यासाठी इतर इमिग्रंट विसा गटदेखील उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, रोजगारावर आधारित काही इमिग्रंट विसा गटातील व्यक्तींना थेट ग्रीन कार्डसाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी अमेरिकेचं नागरिक असणं किंवा कुटुंबातील कोणी अमेरिकेचं नागरिक असणं गरजेचं नसतं. विशिष्ट इमिग्रंट गटातील विसाधारकांना अमेरिकेत पोहोचल्यावर तिथलं कायमस्वरुपी नागरिकत्व मिळू शकतं. प्रत्येक आर्थिक वर्षात (1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर) साधारणपणे 1,40,000 कर्मचाऱ्यांना विशिष्ट इमिग्रंट गटाचा विसा दिला जातो. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यांतर्गत हा विसा देण्यात येतो. रोजगारावर आधारित इमिग्रंट विसामध्ये विविध प्रकारच्या व्यायसायिक क्षेत्रांचा समावेश होतो. विज्ञान, कला, शिक्षण, व्यवसाय या क्षेत्रांमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्यांसाठी काही विशिष्ट विसा प्रकारचे विसा दिले जातात. याशिवाय कुशल कामगारांनाही इमिग्रंट विसा दिला जातो. ज्या क्षेत्रात काम करणारे कुशल कामगार अमेरिकेत नाहीत, त्या क्षेत्रातील कामगारांना विशेष प्राधान्य मिळतं. रोजगारावर आधारित इमिग्रंट विसासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती www.uscis.gov/greencard या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इमिग्रंट विसासाठी अर्ज करणारे अनेकदा ग्रीन कार्ड लॉटरीबद्दल विचारणा करतात. ही प्रक्रिया 'डायवर्सिटी विसा प्रोग्राम' म्हणून ओळखली जाते. या लॉटरी प्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तीला काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव लक्षात घेतला जातो. यासाठी किमान सेकण्डरी स्कूल डिप्लोमा आवश्यक असतो. मात्र या प्रक्रियेसाठी विशिष्ट देशांमधील व्यक्तींचाच विचार केला जातो. ज्या देशातून अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, त्यांचे अर्ज या प्रक्रियेत विचारात घेतले जातात. (मागील 5 वर्षात ज्या देशातील 50 हजारहून कमी व्यक्ती अमेरिकेत स्थलांतरित झाल्या आहेत, त्या देशांमधील नागरिकांचा या प्रक्रियेसाठी विचार केला जातो.) सध्या भारत डायवर्सिटी विसा प्रोग्रामसाठी पात्र नाही. कुटुंबाशिवाय जाणाऱ्यांना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळवण्यासाठी वरील गटांसोबतच आणखीही काही पर्याय उपलब्ध आहेत. याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी यूएस मिशनच्या इमिग्रंट विसा पेजला (in.usembassy.gov/visas/immigrant-visas/) भेट द्या.  

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसा