शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुत्र नदीच्या पात्राचा मार्ग बदलणं व बोगदा बनवण्याचं वृत्त निराधार- चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 16:49 IST

बीजिंग- ब्रह्मपुत्र नदीच्या पात्राचा मार्ग बदलण्यासोबतच बोगदा बनवण्याचं वृत्त निराधार असल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे.

बीजिंग- ब्रह्मपुत्र नदीच्या पात्राचा मार्ग बदलण्यासोबतच बोगदा बनवण्याचं वृत्त निराधार असल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे. ब्रह्मपुत्रेचं पाणी पळवण्यासाठी चीन 1000 किमी लांबीचा बोगदा बनवत असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं चीननंच सांगितलं आहे. यात काहीच तथ्य नाही, रिपोर्ट पूर्णतः चुकीचा आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी स्पष्ट केलं आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, चीनचे इंजिनीअर अशा तंत्रज्ञानाची चाचणी करत आहेत. ज्याच्या वापरानं ब्रह्मपुत्र नदीचा जलप्रवाह अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागू असलेल्या तिबेटहून शिनजियांगकडे वळवण्यासाठी 1000 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाऊ शकतो. चीनच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे शिनजियांगचे कॅलिफोर्नियामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. परंतु चीनच्या या कृतीमुळे पर्यावरणवाद्यांना चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे हिमालयातील क्षेत्रावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. या बोगद्यामुळे चीनच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. दक्षिण तिबेटमधील यारलुंग सांगपो नदीच्या जलप्रवाहालाही शिनजियांगच्या ताकालाकान वाळवंटाकडे वळवण्यात येणार आहेत. भारताच्या या नदीला ब्रह्मपुत्रेच्या नावानंही ओळखलं जातं.ब्रह्मपुत्र नदीवर चीनकडून बरेच बांध बनवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतानंही त्यावर आपत्ती दर्शवली आहे. तिबेट-शिनजियांगच्या जलप्रवाहाचा बोगद्याचा प्रस्ताव तयार करणारे सहाय्यक संशोधक वांग वेई म्हणाले, शोधकार्यासाठी 100हून अधिक वैज्ञानिकांचे वेगवेगळे गट बनवण्यात आले आहेत. हा बोगदा 600 किमीपेक्षा जास्त लांबीचा असेल. हा बोगदा खोदताना इंजीनिअर त्या तंत्राचे परीक्षण करत आहेत ज्याद्वारे यारलिंग जांग्बोचे पाणी तिबेटमधून शिनजियांग प्रांतात नेता येईल.ब्रह्मपुत्र या नदीचा जन्म तिबेटमध्ये होतो. तेथे त्याला यारलुंग जांग्बो या नावाने संबोधित केले जाते. हा बोगदा तिबेटच्या पठाराच्या खालील भागातून अनेक ठिकाणी जाईल. जी ठिकाणे धबधब्यांनी जोडलेली असतील. दरम्यान, डोकलाममध्ये सध्या कोणताही नवीन विवाद निर्माण झालेला नाही, असे डोकलाममधील चिनी सैनिकांच्या सध्याच्या हालचालींसंदर्भातील मिळालेल्या अहवालावरून परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे. डोकलाम सीमेवर चिनी सैनिक तळ ठोकून असून तेथे बांधकाम सुरू आहे, असा दावा सॅटलाइटद्वारे समोर आलेल्या काही छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे की, ''वादग्रस्त भूभागावर चीनकडून सध्या नव्यानं अशा कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. शिवाय, ज्या बांधकामाची चर्चा सुरू झाली आहे ते बांधकाम चिनी सीमेच्या आतमध्येच झाले आहे''. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम