शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 08:41 IST

Israeli PM Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बदला घेण्याची शपथ घेतली आहे.

Iran Attacks Israel : हिजबुल्लाचा प्रमुख नरसल्लाहच्या हत्येनंतर तीन दिवसांनी इराणनेइस्रायलवर मोठा हल्ला केला. मंगळवारी रात्री इराणनेइस्रायलवर शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने एकाच वेळी १८१ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रेइस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली आहेत. या हल्ल्यामुळे आता दोन्ही देशातील वातावरण तापलं असून जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. इराणने मोठी चूक केली असून त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.

बेरूतच्या दक्षिणेकडील हवाई हल्ल्यात लेबनॉनच्या हिजबुल्ला गटाचा नेता मारला गेला होता. त्यानंतर नेतान्याहू यांनी सोमवारीच इराणला कडक शब्दांत इशारा दिला होता. इराण हिजबुल्ला आणि हमासला मदत करतो. मध्यपूर्वेमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही, असं नेत्यानाहू म्हणाले होते. त्यानंतर मंगळवारी इराणनं जवळपास १८१ हून अधिक बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणने क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केली असल्याचे म्हटलं आहे. जेरुसलेममध्ये सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हल्ल्याविषयी नेतान्याहू यांनी भाष्य केलं. "इराणला याची किंमत चुकवावी लागेल.संध्याकाळी इस्रायलवरील हल्ला अयशस्वी झाला. जगातील सर्वात प्रगत असलेल्या इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे आभार मानून आम्ही इराणचा हल्ला हाणून पाडला. इराणमधील राजवटीला आमचा स्वसंरक्षणाचा निश्चय आणि आमच्या शत्रूंचा बदला घेण्याचा आमचा निर्धार समजत नाही," असं पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले.

इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बागेरी यांनी इशारा दिला आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास, या कारवाईची पुनरावृत्ती अधिक ताकदीने केली जाईल, असं बागेरींनी म्हटलं आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इशारा देत इराण युद्धप्रेमी नसल्याचे म्हटले आहे. "कायदेशीर अधिकारांच्या आधारे आणि इराणच्या शांतता आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने नेतन्याहू राजवटीच्या आक्रमकतेला निर्णायक प्रत्युत्तर दिले गेले आहे. ही कारवाई इराणचे हित आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी होती. नेतान्याहू यांना माहिती असायला हवं की इराण युद्धप्रेमी नाही, पण तो कोणत्याही धोक्याच्या विरोधात ठामपणे उभा आहे. इराणशी संघर्ष करू नका," असं  पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लेबनॉन सीमेवर हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही काळापासून संघर्ष सुरु आहे. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी हमासने आपले सैनिक इस्रायलमध्ये पाठवले आणि त्यानंतर गाझामध्ये भीषण संघर्ष सुरू झाला. त्यादरम्यान सुमारे २५० इस्रायलींना ओलीस ठेवण्यात आले होते. मात्र जेव्हा हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह इस्रायली हल्ल्यात मारला गेला तेव्हा उत्तर लेबनॉन संघर्षाचा केंद्रबिंदू बनला. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू