शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:40 IST

अमेरिकेने अणूऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलेले असताना इस्रायलनेही इराणी विमानांवर हल्ला केला.

Iran Israel War: इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या तणावाचे १० दिवसांपूर्वी युद्धात रुपांतर झाले. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरु असताना आता अमेरिकाही या युद्धात उतरली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली. दुसरीकडे इस्रायलनेही इराणला मोठा धक्का दिला आहे. इस्रायलने इराणच्या एफ-१४ लढाऊ विमानांवर हल्ला केला आहे.

अमेरिकेने इराणमधील तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान यांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३० वाजता हा हल्ला झाला. फोर्डोवर बॉम्बचा एक संपूर्ण साठा टाकण्यात आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला धमकी देत त्यांनी आता शांतता ठेवाव, जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर आणखी मोठे हल्ले केले जातील, असं म्हटलं. अशातच इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांना लक्ष्य केले.

 मध्य इराणमध्ये सुमारे ६० इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचे असे इस्रायल डिफेन्स फोर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्ल्यांचा एक भाग म्हणून, आयएएफच्या विमानांनी आणखी तीन इराणी एफ-१४ लढाऊ विमानांवर हल्ला केला. गेल्या आठवड्यात, तेहरानमध्ये इस्रायली हल्ल्यात दोन एफ-१४ विमाने नष्ट करण्यात आली होती. अमेरिकेत बनवलेले एफ-१४ टॉमकॅट्स १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणला पुरवले गेली होती आणि ती अजूनही वापरली जात होती.

इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची माहिती देशाला दिली. "या हल्ल्यांचे उद्दिष्ट जगातील दहशतवादाला प्रायोजित करणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या देशाकडून निर्माण झालेल्या अणु धोक्याला आळा घालणे आहे.  मागच्या ४० वर्षांपासून इराण इस्राइलला, अमेरिकेला संपवण्याची भाषा बोलत आहे. इराणने आमच्या अनेक लोकांना मारले आहे. लक्षात ठेवा, अजूनही अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिका