शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

हृदयद्रावक! हमासने एकाच कुटुंबातील 10 जणांना केलं किडनॅप; फोन करून म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 11:36 IST

Israel Palestine Conflict : गाझामध्ये लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंबाचं अपहरण केल्याची अनेक प्रकरणं आहेत.

इस्रायलवर भयंकर हल्ला केल्यानंतर हमासने तेथून मोठ्या प्रमाणात लोकांचं अपहरण केलं आहे. गाझामध्ये लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण कुटुंबाचं अपहरण केल्याची अनेक प्रकरणं आहेत. एका कुटुंबातील दहा सदस्य हमासच्या ताब्यात आहेत. यामध्ये तीन लहान मुलींचाही समावेश आहे. हमासच्या हल्ल्यानंतर हे लोक बेपत्ता आहेत, त्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे कुटुंब इस्रायलच्या दक्षिण भागात असलेल्या किबुत्झमध्ये राहत होते. या घटनेची माहिती त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने मंगळवारी दिली. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी 20 मिनिटांत 5000 रॉकेट डागून इस्रायलवर 50 वर्षांतील सर्वात मोठा हल्ला केला होता. यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलच्या दक्षिण भागात घुसले. घरांमध्ये घुसखोरी केली. त्यांनी रस्त्यावरील लोकांनाही लक्ष्य केले.

दहशतवाद्यांनी 150 हून अधिक लोकांना ठेवले ओलीस

दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणले. लोकांना गोळ्या घालून ठार केले. महिलांवर बलात्कार झाल्याच्या आणि लोकांना जिवंत जाळल्याच्याही बातम्या आहेत. तसेच, दहशतवाद्यांनी 150 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. या लोकांमध्ये या कुटुंबाचाही समावेश होता. ओलीस ठेवलेल्यांमध्ये इस्रायली वकील शेक्ड हॅरनचे आई-वडील, बहीण, भावजय, तीन लहान मुलं, काका आणि काकू यांचा समावेश आहे.

हॅरन आपली दोन मुलं आणि पतीसह अमेरिकेत सुरक्षित आहे. ती गरोदर आहे. तिची बॉस रुशैल गुर सांगते की, रविवारी जेव्हा तिने कुटुंबीयांना फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुसऱ्या बाजूनेच फोन आला. हा फोन अपहरणकर्त्यांकडून असावे. तिने सांगितले की तिला अपहरणकर्त्याची भाषा नीट समजत नाही, परंतु त्याने 'किडनॅप्ड' आणि 'गाझा' असे दोन शब्द सांगितले.

"कुटुंबाची खूप काळजी वाटत आहे"

हॅरनचं कुटुंब किबुत्झ बे एरी येथे राहत होतं. हे ठिकाण गाझा पट्टीजवळ आहे. येथेच हल्ल्यानंतर हमासचे दहशतवादी घुसले. या आठवड्यात या ठिकाणाहून किमान 100 मृतदेह सापडले आहेत. हॅरनला आता तिच्या आई-वडिलांची आणि बाकीच्या कुटुंबाची खूप काळजी वाटत आहे. अपहरण झालेल्या तीन मुलींपैकी एक 3 वर्षांची, दुसरी 8 वर्षांची आणि तिसरी 12 वर्षांची आहे. तर इतर काही नातेवाईक इटलीचे नागरिक आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिेले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल