शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 06:28 IST

शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला. 

तेल अवीव : गाझामधून इस्रायलमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर हमासविरोधात इस्रायलने मोहीम सुरू केली असून, आता गाझाला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. हमासशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी सोमवारी गाझा पट्टीची संपूर्ण घेराबंदी करण्याचे, वीजपुरवठा खंडित करण्याचे आणि अन्न व इंधनाची रसद तोडण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने गाझा सीमेवर १ लाख सैनिक पाठवले आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला. 

गॅलंट इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या दक्षिणी कमांडमध्ये तयारीचा आढावा घेत होते. गाझा आपल्या मूलभूत गरजांच्या पुरवठ्यासाठी मुख्यत्वे इस्रायलवर अवलंबून आहे आणि अशा निर्णयामुळे या दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या २३ लाख लोकांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. २००७ मध्ये हमासने प्रतिस्पर्धी पॅलेस्टिनी सैन्याकडून सत्ता काबीज केल्यापासून इस्रायल व इजिप्तने गाझावर विविध स्तरावरील निर्बंध लादले आहेत.

इस्रायलने हमासचे वॉर रूम्स एका रात्रीत केले नष्ट इस्रायलच्या हवाई दलाने हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे ५०० युद्ध नियंत्रण कक्ष (वॉर रूम्स) रविवारी रात्री नष्ट केले. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी आतापर्यंत ७०० इस्रायलींचा मृत्यू झाला, तर इस्रायलच्या प्रत्युत्तरात ५०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि २००० हून अधिक जखमी झाले आहेत.

अमेरिकेची लढाऊ विमाने, फोर्ड युद्धनौका मदतीला अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले, आमची जहाजे आणि लढाऊ विमाने मदतीसाठी इस्रायलच्या दिशेने जात आहेत. आम्ही यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड विमानवाहू युद्ध नौका सज्ज ठेवली आहे. 

इस्रायलचे गाझापट्टीवर हल्ले तीव्रइस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीत हवाई हल्ले तीव्र करीत हमासच्या लढवय्यांना मागे हटवण्यास सुरुवात केली आहे. हमासने गाझामधून अभूतपूर्व घुसखोरी सुरू केल्यानंतर दोन दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतर लष्कराने सांगितले की, तूर्तास रस्त्यावरची लढाई जवळजवळ संपुष्टात आली आहे.

परदेशी नागरिकांचा मृत्यूहमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ३३ परदेशी नागरिकांचा जीव गेल्याचेही वृत्त आहे. यामध्ये नेपाळचे १०, अमेरिकेचे ९, थायलंडचे १२ आणि युक्रेनचे २ नागरिक आहेत. या हल्यांचा भारताने निषेध व्यक्त केला आहे.

१३० ओलिसांचा ढाल म्हणून वापरहमासने १३० इस्रायली नागरिकांचे अपहरण केल्याचा दावा केला आहे. त्यांना गाझा पट्टीतील बोगद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. ते या ओलिसांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष