शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 00:21 IST

लष्कराने याला स्व-संरक्षणाची कृती म्हटले असून हिजबुल्लाहकडून इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे म्हटले आहे.

इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर मोठा हवाई हल्ला केला आहे. बुधवारी सकाळपासूनच इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम सुरू असताना, हा हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाह ज्या ठिकाणी मध्यम पल्ल्याच्या रॉकेटचा साठा करत होते, त्याच ठिकाणी हा हवाई हल्ला करण्यात आला. लष्कराने याला स्व-संरक्षणाची कृती म्हटले असून हिजबुल्लाहकडून इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, असे म्हटले आहे.

युद्धविरामावर प्रश्नचिन्ह - हा हल्ला युद्धबंदीच्या काही तासांनंतर झाला असून, इस्रायलने कराराचे उल्लंघन केले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हिजबुल्लाच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे.

लेबनीज लोकांमध्ये भीतीचे वातावरण- एपीच्या वृत्तानुसार, 60 दिवसांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. राजधानी बेरूतपासून ते दक्षिणेकडील टायरपर्यंत इस्त्रायने  जबरदस्त हल्ले केले आहेत. युद्धबंदीनंतर लेबनीज लोक आता आपापल्या घरी परतत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिजबुल्लाचा गड मानल्या जाणाऱ्या बेरूतच्या दक्षिणी उपनगरातील दहियेहमध्ये संपूर्ण ब्लॉक्स नष्ट झाले आहेत. उंच इमारती तुटून आता त्या ठिकाणी काँक्रीटचा ढिगारा झाला आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू