Israel US Iran War: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. “शक्तीतूनच शांतता येते” असे म्हणत त्यांनी इराणला अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “PEACE THROUGH STRENGTH, TO PUT IT MILDLY!!!” अशी पोस्ट केली. त्यांची ही पोस्ट अमेरिका-इराण तणाव शिगेला पोहोचला असताना आली आहे, त्यामुळे या विधानाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
होर्मुझ सामुद्रधूनीवरून तणाव
या आधी ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधूनी (Strait of Hormuz) खुला ठेवण्यासाठी 48 तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनी इशारा दिला होता की, जर हा जलमार्ग बंद ठेवला, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करेल.
इराणचा अमेरिकेला इशारा
अमेरिकेच्या धमकीनंतर इराणनेही कडक भूमिका घेतली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ने इशारा देत म्हटले की, जर अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला, तर इराण अमेरिकेच्या सैन्य तळांना वीज पुरवठा करणाऱ्या प्रादेशिक वीज प्रकल्पांवर हल्ला करेल. तसेच, इस्रायलच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले जाईल.
परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता
राजकीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचे “शक्तीतून शांतता” हे विधान हे प्रत्यक्षात इराणला दिलेला थेट राजकीय आणि लष्करी इशारा आहे. दोन्ही देश आक्रमक भूमिका घेत असल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, तणाव या तीन देशांत सुरू आहे, मात्र त्याचा परिमाम संपूर्ण जगावर पडण्याची भीती आहे. आधीच या तणावामुळे जगावर उर्जा संकट आले आहे. त्यात आता परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Amid rising US-Iran tensions, Trump warns Iran, stating, "Peace through strength." He issued ultimatums regarding the Strait of Hormuz, threatening Iranian power plants. Iran retaliated, vowing to target US bases and Israeli infrastructure, escalating Middle East tensions and global energy concerns.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, ट्रंप ने ईरान को चेतावनी दी, "शक्ति से शांति आती है।" उन्होंने होर्मुज जलडमरूमध्य के बारे में अल्टीमेटम जारी किया, ईरानी बिजली संयंत्रों को धमकी दी। ईरान ने जवाबी कार्रवाई करते हुए अमेरिकी ठिकानों और इजरायली बुनियादी ढांचे को निशाना बनाने की कसम खाई, जिससे मध्य पूर्व में तनाव और वैश्विक ऊर्जा चिंताएं बढ़ गईं।