शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:02 IST

Israel-Lebanon: इस्रायली सैन्याने या भागात भीषण हल्ले केले आहेत.

Israel-Lebanon:इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवस चाललेला भीषण संघर्ष युद्धविरामाने थांबला. मध्यपूर्वेतील परिस्थिती आता काहीशी सामान्य होईल, असे मानले जात होते. परंतु इस्रायलने अचानक आपले लक्ष लेबनॉनकडे वळवले आहे. शुक्रवारी इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ उडाला झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या भागात अचानक मोठे स्फोट ऐकू आले, इस्रायली लढाऊ विमानांच्या गर्जनाही झाल्या. याशिवाय, दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागात पाळत ठेवणारे ड्रोन देखील उडताना दिसले.

हल्ले का केले?इस्रायली सैन्याने म्हटले की, त्यांनी हे हल्ले हिज्बुल्लाहच्या कारवाया थांबवण्यासाठी केले. दक्षिण लेबनॉनमधील नबतियाह अल-फौका आणि इक्लिम अल-तुफाहच्या टेकड्यांवरील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये हिज्बुल्लाहच्या पायाभूत सुविधा आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले.

शफाक न्यूजच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सांगितले की, इस्रायली लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील माउंट शुकेफ भागात एका लपण्याच्या ठिकाणाला लक्ष्य केले. हे लपण्याचे ठिकाण हिजबुल्लाहच्या अग्नी नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणेचे संचालन करण्यासाठी वापरले जात होते. इस्रायली सैन्याच्या मते, हे एका भूमिगत प्रकल्पाचा भाग आहे, जे पूर्वी इस्रायली हल्ल्यांमध्ये नुकसान झाले होते, परंतु आता ते पुन्हा बांधले जात आहे.

झुकणार नाही, लढाई सुरूच राहीललेबनॉनच्या न्यूज पोर्टल नाहारनेटनुसार, हल्ल्याच्या एक दिवस आधी हिजबुल्लाहचे उपप्रमुख शेख नैम कासिम यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, लेबनॉन कोणाच्याही दबावाखाली येणार नाही.त्यांहा आमचा देश आहे, आम्हाला तो आदराने हवा आहे आणि आम्ही त्यासाठी लढू.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू