शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

इस्रायली सैन्याने हमासच्या कमांडरचा केला खात्मा, इस्रायलवर केलेल्या भीषण हल्ल्यात होता सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:31 IST

हमासच्या एलिट नुखबा फोर्सचा कमांडर अब्द अल-हादी सबा दक्षिण गाझामधील खान युनिस भागात ठार झाला

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीये. गाझामध्ये इस्रायलला आणखी एक यश मिळाले आहे. मंगळवारी IDFने वृत्त दिले की खान युनिसमधील हमासच्या एलिट नुखबा फोर्सचा कमांडर अब्द अल-हादी सबा दक्षिण गाझामधील खान युनिस भागात ठार झाला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान अब्द अल-हादी साबाने किबुत्झ नीर ओझवर हल्ल्याचे नेतृत्व केले होते असे लष्कर आणि शिन बेटचे म्हणणे आहे. खान युनूस येथील मदत छावणीवर ३१ डिसेंबर रोजी इस्रायली सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-हादी मारला गेल्याचा दावा लष्कराने केला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, अल-हादीचा ७ ऑक्टोबरला किबुत्झनीर ओझवरील हल्ला आणि डझनभर लोकांना पकडण्यात तसेच गाझा युद्धादरम्यान इस्रायली सैन्यावर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग होता.

७ ऑक्टोबर हल्ल्यातील गुन्हेगारांचा खात्मा

अल-हादीचा खात्मा करणे हा शिन बेटच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या कारवाईचा एक भाग होता. गाझावरील हल्ल्याची सुरुवात करताना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात भाग घेतलेल्या सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे लष्करी आक्रमण ७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या नवीन अंदाजानुसार, आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये किमान ४५,५४१ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि १,०८,३३८ जखमी झाले आहेत.

गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने उत्तर गाझा येथील कमल अडवान हॉस्पिटलवर छापा टाकून ते पेटवून दिले होते. याशिवाय रुग्णालयाच्या संचालकाला अटक करण्यात आली होती. २४० संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याचाही दावा लष्कराने केला आहे. मंगळवारी जारी केलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे की इस्रायलने १२ ऑक्टोबर २०२३ ते ३० जून २०२४ पर्यंत किमान २७ रुग्णालये आणि १२ इतर वैद्यकीय सुविधांवर १३६ हल्ले केले आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धterroristदहशतवादी