इस्रायलने संरक्षण तंत्रज्ञानात एक मोठी झेप घेत जगात प्रथमच प्रत्यक्ष युद्धभूमीवर हाय-एनर्जी लेझर शस्त्राचा यशस्वी वापर केला आहे. इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहकडून होणाऱ्या रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी इस्रायलने 'आयरन बीम' सक्रिय केले असून, याद्वारे अवघ्या काही सेकंदात शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच भस्मसात केली जात आहेत.
हे शस्त्र प्रकाशाच्या वेगाने काम करते. एकदा रॉकेट किंवा ड्रोन रडारवर आले की, लेझर बीम त्यावर आदळतो आणि क्षणार्धात त्याचे अस्तित्व संपवतो. इस्रायलच्या 'आयरन डोम'चे एक क्षेपणास्त्र डागण्यासाठी ५०,००० डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येतो. याउलट, 'आयरन बीम'चा एक लेझर शॉट डागण्यासाठी दोन डॉलर्सपेक्षाही कमी खर्च येतो.
१० किमीची 'नो-गो' झोनही प्रणाली १० किलोमीटरच्या मर्यादेत येणाऱ्या ड्रोन, रॉकेट, मोर्टार आणि कमी उंचीवरील विमानांना शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे. पारंपारिक क्षेपणास्त्र यंत्रणांना वेळोवेळी रिफिल करावे लागते. मात्र, 'आयरन बीम' जोपर्यंत वीज पुरवठा सुरू आहे, तोपर्यंत सतत मारा करू शकते. याचा दारूगोळा कधीच संपत नाही.
युद्धातील पहिले यशहिजबुल्लाहने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर शेकडो रॉकेट्स डागली होती. या दरम्यान इस्रायलने प्रथमच 'आयरन बीम' कार्यान्वित केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिज्युअल्समध्ये लेझरचा निळा प्रकाश रॉकेटला धडकताना आणि त्याचे स्फोट होताना स्पष्टपणे दिसत आहे.
Web Summary : Israel successfully tested its 'Iron Beam' laser system, intercepting rockets and drones. This high-energy laser weapon offers a cost-effective defense against attacks within a 10km range, operating continuously with electricity, unlike traditional missile systems. It was first used against Hezbollah rockets.
Web Summary : इजराइल ने सफलतापूर्वक 'आयरन बीम' लेजर सिस्टम का परीक्षण किया, रॉकेटों और ड्रोन को रोका। यह उच्च-ऊर्जा लेजर हथियार 10 किमी की सीमा के भीतर हमलों के खिलाफ एक किफायती रक्षा प्रदान करता है, जो पारंपरिक मिसाइल प्रणालियों के विपरीत बिजली के साथ लगातार काम करता है। इसका पहला उपयोग हिजबुल्लाह रॉकेटों के खिलाफ किया गया था।