शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 05:57 IST

Israel-Iran Tensions Update: ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्यानंतर इस्राइल आणि इराणमधील संघर्षाने भयानक रूप धारण केले आहे.

ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी लक्ष्य केल्यानंतर इस्राइल आणि इराणमधील संघर्षाने भयानक रूप धारण केले आहे. आता इराणनेही ऑपरेशन प्रॉमिस सुरू करून इस्राइलवर जोरदार प्रतिहल्ला केला असून, इस्राइलच्या जवळपास प्रत्येक भागाला शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे इस्राइलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना तातडीने तळघरांमध्ये आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, इस्राइलच्या संरक्षण यंत्रणांनी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील बहुतांश क्षेपणास्त्रं रोखण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्यात काही इस्राइली नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

इस्राइल डिफेन्स फोर्सच्या मिलिट्री रेडियोने दिलेल्या माहितीनुसार इराणने इस्राइलवर सुमारे १०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्राइलमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर इराणने सुरू केलेलं ऑपरेशन टू प्रॉमिस हे मेजर जनरल मोहम्मद बाघेरी, आयआरजीसीचे प्रमुख मेजर जनरल होसेन सलामी आणि आयआरजीसी एअरोस्पेसचे कमांडर ब्रिगेडियर जनरल आमिर अली हाजिजादेह यांच्यासह इतर इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येचा बदला आहे, असे इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान, इराणकडून डागण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांना यशस्वीरीत्या रोखण्यात आल्याचा दावा इस्राइलच्या सैन्यदलांनी केला आहे. देशाच्या अनेक भागात मदत आणि बचाव करणाऱ्या पथकांना तैनात करण्यात आलं आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर इस्राइलच्या सैन्याने नागरिकांना तळघरातून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इराणी हल्ल्याचा धोका तूर्तास कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

तेल अवीवमध्ये इराणकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये ३४ नागरिक जखमी झाले आहेत. तर एक महिला ढिगाऱ्याखाली अडकून गंभीर जखमी झाली आहे.इस्राइल आणि इराणमध्ये पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचीही तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अमेरिकेने इराणला सक्त इशारा दिल्याचं वृत्त आहे. जर अमेरिकेशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं तर इराणसाठी परिणाम भयंकर असतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी मेककॉय पिट यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय