शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:48 IST

Israel-Iran Conlfict: इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये इराणमधील अणुकेंद्रं आणि तेथील सत्तांतर हे इस्राइलचं मुख्य लक्ष्य असल्याचं दिसत आहे. तसेच ही अणुकेंद्रं नष्ट करण्यासाठी इस्राइल अमेरिकेकडे सातत्याने मदत मागत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील अणुकेंद्रांबाबत इस्राइलला धक्का देणारं विधान केलं आहे.

इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला घातक संघर्ष कमी होण्याची कुठलीही चिन्हे सध्या दिसत नाही आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले आणि प्रतिहल्ले होत असून, त्यात दोन्हीकडे जीवित आणि वित्तहानी होत आहे. या संपूर्ण संघर्षामध्ये इराणमधील अणुकेंद्रं आणि तेथील सत्तांतर हे इस्राइलचं मुख्य लक्ष्य असल्याचं दिसत आहे. तसेच ही अणुकेंद्रं नष्ट करण्यासाठी इस्राइल अमेरिकेकडे सातत्याने मदत मागत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील अणुकेंद्रांबाबत इस्राइलला धक्का देणारं विधान केलं आहे.

इराणविरुद्धच्या संघर्षात इस्राइलला मदत करण्यासाठी अमेरिकन सौन्य पाठवण्याच्या शक्यतेबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य पाठवणे हा आमच्यासाठी शेवटचा पर्याय असेल. सध्यातरी आमच्याकडे सुमारे दोन आठवड्यांचा वेळ  आहे, असे सांगितले. ट्रम्प पुढे म्हणाले की, इस्राइलजवळ इराणमधील भूमिगत फोर्डो अणुकेंद्र स्वबळावर नष्ट करण्याची क्षमता आहे. मात्र ते फोर्डोच्या केवळ एका भागाला थोडंफार नुकसान पोहोचवू शकतात. मात्र त्याला नष्ट करू शकत नाहीत. 

अमेरिकेच्या मते इराणकडे अणुबॉम्ब तयार करण्याची पूर्ण क्षमता आहे, असे वृत्त अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, आपल्या सर्वोच्च नेत्यांनी आदेश दिल्यास इराण काही आठवड्यांमध्येच अणुबॉम्ब तयार करू शकतो. इराणकडे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व साहित्य आहे. जर इराणने अणुबॉम्ब तयार केला तर ते संपूर्ण जगासाठी एक मोठं संकट असेल.

दरम्यान, ऑपरेशन रायझिंग लॉयन अंतर्गत इस्राइलने १२ जून रोजी इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करून जोरदार हल्ले केले होते. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरदाखल कारवाई करताना तेल अविवसह इस्राइलमधील सर्व प्रमुख शहरांवर तुफानी हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्राइलमध्येही मोठ्या प्रमाणवर वित्तहानी होत आहे.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय