शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तुफानी हल्ले तरी इस्राइल नष्ट करू शकला नाही इराणचं अणुकेंद्र, एफ-३५ सुद्धा निष्प्रभ, कारण काय?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:14 IST

Israel Iran Conflict:

गेल्या अनेक वर्षांपासून अणुशक्ती बनण्यासाठी प्रयत्नशील असलेला इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असल्याचा दावा करत इस्राइलने ऑपरेशन रायझिंग लायन राबवत इराणमधील अणुकेंद्रांवर जोरदार हल्ले केले होते. तसेच इराणमधील अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांनाही टिपले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये भीषण संघर्षाला सुरुवात झाली आहे. या कारवाईदरम्यान, इराणमधील अणुकेंद्र पूर्णपणे नष्ट करणे हे इस्राइलचे प्रमुख लक्ष्य होते. मात्र इस्राइल हे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी ठरणार का? आतापर्यंतच्या कारवाईत इराणच्या अणुकार्यक्रमाचं किती नुकसान झालं आहे, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. प्रसारमाध्यमांमधील वृत्त आणि उपग्रहांद्वारे मिळवलेली छायाचित्रे पाहिली असता इस्राइलच्या हल्ल्यांमध्ये इराणची संशोधन केंद्र आणि बांधकामांच्या सुविधांची हानी झाली आहे. मात्र या हल्ल्यांतून इराणची पूर्ण आण्विक ताकद संपुष्टात आणणं इस्राइलला शक्य झालेलं नाही. इराणकडे असलेलं शेकडो पौंड युरेनियम अद्याप सुरक्षित असल्याचा दावा इराणी तज्ज्ञांकडून केला जात आहे.

इराणचा अणुकार्यक्रम हा इस्राइलच्या अस्तित्वासाठी धोकादायक असल्याने तो नष्ट करण्यात येईल, असे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले होते. तसेच आम्ही इराणच्या अणुसंवर्धन कार्यक्रमाच्या हृदयावर आघात केला आहे, असा दावाही नेतन्याहू यांनी इराणवर हल्ला केल्यानंतर केला होता. मात्र आता दोन्ही देशांकडून येत असलेले व्हिडीओ आणि सॅटेलाईट इमेजमधून या कारवाईत इराणचा अणुकार्यक्रम कायमचा बंद पडेल एवढी हानी झाली नसल्याचे दिसत आहे.

इस्राइलने प्रामुख्याने लक्ष्य केलेले फोर्डो अणुकेंद्र हे कोम शहरापासून  २० मैल दूर अंतरावर एका पर्वताच्या आत बनवण्यात आलं आहे. केवळ बॉम्बफेक करून ते नष्ट करणं शक्य नाही आहे. याचं संरक्षण इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्म्स पाहतात. हा तळ पर्वताच्या आत खोलवर खोदण्यात आलेला आहे. तसेच हे केंद्र जमिनीच्या पृष्टभागापासून १०० मीटर खाली आहे. ते अत्यंत सुरक्षित असल्याचे मानले जाते. २००९ मध्ये अमेरिका, फ्रास आणि ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने याची माहिती जगाला दिली होती. या केंद्रामध्ये सुमारे ६० टक्क्यांपर्यंत शुद्ध युरेनियम तयार करण्यात आला आहे. तर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी इराणला ९० टक्के शुद्ध युरेनियमची आवश्यकता आहे.

इस्राइलने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह फोर्डोवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या भूकंपासारखे धक्केही बसले. त्यात फोर्डो केंद्राचं किरकोळ नुकसान झाललं आहे. मात्र मोठी हानी झालेली नाही, असा दावा इराणने केला आहे. सद्यस्थितीत इस्राइलकडे फोर्डो केंद्र पूर्णपणे नष्क करेल, एवढ्या शक्तीचा बॉम्ब उपलब्ध नाही आहे. फोर्डोची तटबंदी केवळ बंकर बस्टर्स तोडू शकतात. मात्र ते बॉम्ब टाकण्यासाठी बी-२ बॉम्बर्स विमानांची आवश्यकता आहे. मात्र सध्यातरी ही विमाने इस्राइलला देण्यास अमेरिका तयार नाही आहे. अमेरिकेला या युद्धात थेट उतरायचे नाही आहे. अमेरिका फोर्डो केंद्र नष्ट करू शकते. पण सद्यस्थितीत त्यांची तशी राजकीय इच्छाशक्ती नसल्याचेही बोलले जात आहे.  

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय