शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:15 IST

Israel-Iran Ceasefire Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राइल आणि इराणमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केल्याने गेल्या १२ दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता थांबेल, असी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली आहे.

इस्राइलने ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इराण आणि इस्राइलमध्ये मागच्या १२ दिवसांपासून भीषण संघर्ष सुरू होता. यादरम्यान, दोन्ही देशांकडून एकमेकांवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. अखेरीस भारतीय वेळेनुसार आज पहाटे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केल्याने गेल्या १२ दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता थांबेल, असी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांनी युद्धविरामाबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इराणविरोधातील हे युद्ध इस्राइलने सुरू केले आहे, हे आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच युद्धविराम किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अद्याप कुठल्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. जर इस्राइली सरकारने इराणच्या जनतेविरोधात सुरू केलेले बेकायदेशीर हल्ले सकाळी ४ वाजण्याआधी बंद केले तर त्यानंतर प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा आमचाही कुठला विचार नसेल. आमच्या लष्करी मोहिमेच्या समाप्तीबाबत अंतिम निर्णय सर्वात शेवटी घेतला जाईल.

दरम्यान,  इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी केली होती. इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधीसाठी एकमत झाले आहे. पुढील १२ तासांत १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध संपलं असं अधिकृतरीत्या समजलं जाईल.१२ दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलUnited Statesअमेरिका