शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 23:07 IST

आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केले आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायली गुप्तचर तळाला भेट दिली आणि हिजबुल्ला विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. तसेच, लेबनीज जनतेला त्यांनी शांततेचे आवाहन केले आणि हिजबुल्लाहवरील कारवाईचे समर्थन केले. आमचे युद्ध तुमच्याशी नाही. तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा, असे आम्ही कालच सांगितले होते असे नेतन्याहू म्हणाले. 

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, "आमची लढाई तुमच्या लोकांच्या विरोधात नाही आहे, आमची लढाई हिजबुल्लाहविरुद्ध आहे. नसरल्लाह तुम्हाला विनाशाकडे घेऊन जात आहे. मी तुम्हाला काल सांगितले होते की, त्याने ज्या घरांमध्ये क्षेपणास्त्रे ठेवली आहेत, ती घरे खाली करा, जिथे राहण्याच्या खोलीत क्षेपणास्त्रे आणि गॅरेजमध्ये रॉकेट आहेत, ते सुरक्षित राहणार नाहीत. हिजबुल्लाह आणि नसरल्लाह यांच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करा, ते तुमच्याच भल्यासाठी आहे."

दरम्यान, इस्रायलकडून हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. तर हिजबुल्लाह देखील सतत त्यांच्यावर बॉम्बफेक करत आहे. नुकत्याच झालेल्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटांनंतर इस्रायलने हिजबुल्लाविरुद्ध मोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत. सातत्याने रॉकेट-क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केले आहे.

इस्रायलने हिजबुल्लाहच्या अनेक कमांडरचा खात्मा केला आहे, इस्रायलकडून सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. दुसरीकडे, हिजबुल्लाहकडून देखील रॉकेट हल्ले होत आहेत. आतापर्यंतच्या संघर्षात हिजबुल्लाला मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यामुळे आणि प्रतिहल्ल्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मोठे युद्ध होण्याची भीती वाढली आहे.

जागतिक व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता या युद्धामुळे तेल उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. मध्यपूर्वेत लेबनॉनचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे या युद्धाचे जागतिक व्यापारावरही परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत जगाला पुन्हा महागाईचा सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीय