शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 19:29 IST

पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत

Israel-Hamas War : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टा (ICC) युद्ध गुन्ह्यांसाठी त्यांच्याविरोधात अटका वॉरंट जारी करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे नेतन्याहूंसोबतच हमासच्या प्रमुख नेत्यांविरोधातही अटक वॉरंटची मागणी करण्यात आली आहे. आयसीसीचे मुख्य वकील करीम खान यांनी वॉरंटसाठी अर्ज केला आहे. त्यांनी हमास आणि नेतान्याहू यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचे गंभीर आरोप केले आहेत.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच ICC युद्धगुन्हे, मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहाराच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी करते. इस्रायलवर हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने केलेली कारवाई, हा युद्धगुन्हा म्हणून आयसीसी विचारात घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडूनही असे घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता असे मानले जात आहे की, ICC लवकरच नेतान्याहू आणि हमास नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करू शकते.

इस्रायल आयसीसीचा सदस्य नाहीइंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने इस्रायली पंतप्रधानांविरुद्ध अटक वॉरंट तयार केले तरी, इस्रायल त्याला मान्यता देणार नाही. याचे कारण म्हणजे, इस्रायल या आंतरराष्ट्रीय कोर्टाचा सदस्य नाही. मात्र, 2015 मध्ये पॅलेस्टिनी प्रदेशाचा या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात समावेश करण्यात आला. इस्रायल-हमास युद्धाच्या सुरुवातीला आयसीसीच्या मुख्य अभियोक्त्याने म्हटले होते की, इस्रायलमध्ये हमास आणि गाझामध्ये इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत न्यायालयाचे अधिकार आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून आयसीसी या युद्धगुन्ह्याची चौकशी करत आहे, जी आता पूर्णत्वास आली आहे.

गाझामध्ये कायद्यांचे उल्लंघन गाझा पट्टीत मानवतावादी कायद्यांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीकडून ही कारवाई करण्यात येत असल्याचे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेतन्याहू यांच्याशिवाय इतर अनेक वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले जाऊ शकते. याशिवाय हमासचे प्रमुख नेतेही आयसीसीच्या या वॉरंटच्या कक्षेत येऊ शकतात.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय