शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 11:42 IST

बुधवारी इस्रायली सैन्याची तुकडी ताल अल सुल्तान भागात गस्तीवर होती. यावेळी त्यांना तीन दहशतवादी दिसले. त्यांना पाहून रणगाड्यातून एक तोफ त्याच्या दिशेने डागण्यात आली.

इस्रायल-हमास युद्धात आता आणखी काही देश उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सुरु झालेले युद्ध आता लेबनानपर्यंत पोहोचले आहे. अद्याप इराणने केलेल्या हल्ल्याला इस्रायलने प्रत्यूत्तर दिलेले नाही. या दोन देशांत युद्ध सुरु झाले तर जगभरात खळबळ उडणार आहे. इस्रायलने इराणमध्ये घुसून हमासच्या प्रमुखाला मारले होते. आता त्याची जागा घेणाऱ्या याह्या सिनवार यालाही यमसदनी धाडण्यात आले आहे. 

सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला आहे. यात सिनवारच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली आहे. तसेच त्याची बोटे छाटण्यात आली आहेत. तसेच त्याचा दातही तोडण्यात आल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सिनवारच्या शरीरावर रणगाड्यांच्या तोफगोळ्यामुळे झालेल्या जखमाही आहेत. 

बुधवारी इस्रायली सैन्याची तुकडी ताल अल सुल्तान भागात गस्तीवर होती. यावेळी त्यांना तीन दहशतवादी दिसले. त्यांना पाहून रणगाड्यातून एक तोफ त्याच्या दिशेने डागण्यात आली. नंतर चकमक सुरु झाली. यात तिघे दहशतवादी मारले गेले. त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले होते. यामुळे हा कपडा हटविण्यात आला, तेव्हा सिनवार सारखा दिसणारा यात होता. याची पुष्टी करण्यासाठी इस्रायली सैन्याने सिनवारचे बोट कापून इस्रायलला पाठविले. त्यापूर्वी दातांवरून पुष्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, त्यातून काही समजले नाही. यामुळे सिनवारची बोटे कापून नेण्यात आली.  

सिनवार जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. यामुळे डीएनए चाचणीद्वारे मारला गेलेला सिनावरच आहे हे समजण्यासाठी त्याचे बोट आणले गेले, असे इस्रायल नॅशनल सेंटर ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रमुख चेन कुगेल यांनी सांगितल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सिनवार त्या ठिकाणी आहे याची इस्रायल सैन्याला कल्पना नव्हती. तीन लोक एका घराच्या आडोशाने दुसऱ्या घराकडे पळताना दिसले होते. चकमकीत ते मारले गेले, असे इस्रायली सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिनवार मृत झाल्याचे समजताच त्याचा मृतदेह इस्रायलला आणण्यात आला आहे. तसेच त्या भागाला घेरण्यात आले आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष