शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 18:54 IST

Israel Hamas War: 2015 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मुश्ताहाला 'जागतिक दहशतवादी' घोषित केले होते.

Israel-Hamas War : इस्रायल एकीकडे लेबनॉन आणि इराणशी संघर्ष करत आहे, तर दुसरीकडे गाझावरही त्याचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. दरम्यान, आता इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) गुरुवारी पॅलेस्टिनी संघटना हमासच्या तीन सर्वोच्च नेत्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, हमास कमांडर समेह सिराज आणि समेह औदेह हेदेखील मारले गेले आहेत. 

या कारवाईची माहिती देताना IDF ने सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी हवाई हल्ले केले होते, ज्यात हमासचे तीन वरिष्ठ नेते रावी मुश्ताहासह समेह सिराज आणि समेह औदेह ठार झाले. तिघेही उत्तर गाझामधील भूमीगत बंकरध्ये लपले होते. या जागेचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून केला जायचा. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईबाबत इस्रायलने आता खुलासा केला आहे.

तीन महिन्यांपूर्वी केलेला हल्ला 3 महिन्यांपूर्वी गाझामध्ये IDF आणि ISA च्या संयुक्त हल्ल्यात गाझामधील हमास सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह अनेक दहशतवादी मारले गेले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी उत्तर गाझामधील भूमिगत बंकरवर ताबडतोड हल्ले केले होते. हे बंकर हमासचे कमांड आणि कंट्रोल सेंटर होते. हमासचे सर्वोच्च नेते अनेक दिवसांपासून याच बंकरमध्ये लपून होते. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात इस्रायलने लेबनॉनमधील बेरुत येथे केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह यालाही ठार केले आहे.

इस्रायलच्या माहितीनुसार, रावी मुश्ताहा हमासचा सर्वोच्च नेत्यांपैकी एक होता. त्याचा हमासच्या सैन्य तैनातीशी संबंधित निर्णयांवर त्याचा थेट प्रभाव होता. तो हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनवारचा उजवा हात होता. 2015 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मुश्ताहाला 'जागतिक दहशतवादी' घोषित केले होते. गेल्या वर्षी हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 1205 लोक मारले गेले होते. त्या हल्ल्याची योजना मुश्ताहाने आखली होती. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्ध