शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

इस्रायल-हमास युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री; 2000 सैनिक अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 19:05 IST

Israel Palestine Conflic : हमासच्या हल्ल्याविरोधात एकता दाखवण्यासाठी आपण इस्रायलला जात असल्याचं बायडेन यांचं म्हणणं आहे. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार सुमारे 2000 अमेरिकन सैनिक आणि युनिट्सना अलर्ट करण्यात आले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैनिकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

हमाससोबतच्या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अमेरिकेने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इस्रायलची साथ सोडणार नाही. या आश्वासनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन बुधवारी इस्रायलला पोहोचत आहेत.

हमासच्या हल्ल्याविरोधात एकता दाखवण्यासाठी आपण इस्रायलला जात असल्याचं बायडेन यांचं म्हणणं आहे. अमेरिका आणि इस्रायलची मैत्री कोणापासून लपलेली नाही. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे. अशा स्थितीत इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वीच जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत ते इस्रायलच्या पाठीशी उभे राहतील, असे बायडेन सरकारनं म्हटलं आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा मंगळवार हा 11 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हे हल्ले इस्रायलवर करण्यात आले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटलं आहे. हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेण्यात आली. या युद्धात दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मरण पावले आहेत.

इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईनमधील हमासचे लढवय्येही गप्प बसलेले नाहीत. ते अजूनही तीन आघाड्यांवरून इस्रायलवर हल्ले करत आहेत. लेबनान, समुद्राला लागून असलेला भाग आणि इजिप्तला लागून असलेल्या दक्षिण गाझा येथून रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. गुरुवारी मध्य इस्रायलच्या वेस्ट बॅंकेच्या दिशेनेही रॉकेट डागण्यात आले.

7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धानंतर गाझामध्ये सात दिवसांत 22 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायलने 10 रुग्णालये आणि 48 शाळांवर बॉम्बफेक केली आहे. गाझामध्ये आतापर्यंत मृतांचा आकडा 1400 च्या वर गेला आहे. यामध्ये 447 हून अधिक मुलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझामधील तीन लाखांहून अधिक लोकांना घरं सोडण्यास भाग पाडले गेले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायल