शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Israel : अली कादी ते अबू मेरादपर्यंत, इस्राइलने १० दिवसांत हमासच्या ६ टॉप कमांडरचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:31 IST

Israel Hamas war: इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये इस्राइलने भीषण हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सहा टॉप कमांडरचा खात्मा केला आहे.

इस्राइल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या दहा दिवसांमध्ये इस्राइलने भीषण हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या सहा टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या कमांडरची माहिती देताना आयडीएफने सांगितले की, त्यांनी अली कादी याला ठार मारलं आहे. तो हमासच्या नुखबा जबल्या असॉल्ट कंपनीचा सदस्य होता. तसेच त्यांनी जाचारियाह अबू मामर याला ठार मारण्यात आले आहे. तो हमासच्या परराष्ट्र व्यवहारांचा प्रमुख होता.

त्याबरोबरच इस्राइली सैन्याने बिलाल अल कद्रा यालाही ठार मारलं आहे, तो नुखबा खान यूनिस असॉल्ट कंपनीचा कमांडर होता. त्याशिवाय इस्राइली फोर्सच्या एअरस्ट्राइकमध्ये मारला गेलेला हमासच्या चौथ्या कमांडरचं नाव मुमताज ईद आहे. तो हमासच्या दक्षिण डिस्ट्रिक्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटीचा कमांडर होता. ठार मारण्यात आलेल्या हमासच्या पाचव्या कमांडरचं नाव आहे जोयेद अबू. तो हमास सरकारचा वित्तमंत्री होता. या लढाईत मारला गेलेला सहावा कमांडर आहे मेराद अबू. तो हमासच्या हवाई विंगचा प्रमुख होता.

मिळालेल्या माहितीनुसार हमासच्या हवाई विंगचा कमांडर मेराद अबू याला ठार मारण्यासाठी इस्राइली सुरक्षा दलांनी एका मुख्यालयाला लक्ष्य केले. तिथून हमास आपल्या हवाई हालचालींवर नियंत्रण ठेवत असे. मेराद अबू याने गेल्या आठवड्यात हमासने इस्राइलमध्ये केलेल्या भयानक हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.  त्यात हमासच्या सैनिकांनी हँड ग्लायडर्सच्या मदतीने इस्राइलमध्ये प्रवेश केला होता.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलterroristदहशतवादी