शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हमास बनला 'जल्लाद', इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन आठ जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:41 IST

Israel-Hamas-Gaza : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या काही लोकांना भररस्त्यात सर्वांसमोर गोळ्या घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Israel-Hamas-Gaza : दोन वर्षांच्या सततच्या संघर्षानंतर अखेर इस्रायल आणि गाझामधील युद्ध तात्पुरतं थांबलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही बाजूंनी युद्धविराम (सीजफायर) करारास मान्यता दिली. मात्र, जमिनीवरील वास्तव काही वेगळंच दिसतंय. अलिकडेच हमासने अनेक इस्रायली बंधकांची सुटका केल्याचे फोटो, व्हिडिओ जगाने पाहिले. मात्र, आता त्याच हमासने काही लोकांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

एएफपीच्या (AFP) अहवालानुसार, १४ ऑक्टोबर रोजी हमासने गाझाच्या उद्ध्वस्त शहरांवर आपली पकड अधिक मजबूत केली आणि बदल्याची कारवाई सुरू केली. त्यांनी इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरून काही स्थानिक नागरिकांना रस्त्यांवर गोळ्या घालून ठार मारलं. 

हमासने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या आणि गुडघ्यावर बसवलेल्या आठ संशयितांना गोळ्या घालताना दाखवण्यात आलं आहे. हमासचा दावा आहे की, हे सर्व इस्रायलचे सहकारी होते आणि इस्रायलला गुप्त माहिती पुरवायचे. 

या भयावह दृश्यांमध्ये हमासचे बंदूकधारी लढवय्ये गर्दीसमोर गोळ्या झाडताना दिसतात. हा व्हिडिओ सोमवार रात्री हमासच्या अल-अक्सा टीव्हीच्या टेलिग्राम चॅनेलवर प्रसारित झाला. त्याच्या कॅप्शनमध्ये “इस्रायलच्या सहकाऱ्यांना मृत्युदंड” असं लिहिलं होतं.  एएफपीच्या मते, हे फुटेज शस्त्रसंधीच्या पाचव्या दिवशीचं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hamas Executes Eight Alleged Informants for Israel in Gaza

Web Summary : Hamas executed eight individuals in Gaza, accused of spying for Israel. The killings occurred after a ceasefire, with Hamas claiming the victims provided intelligence to Israel. The execution video was shared on Hamas' Telegram channel.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प