शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Israel Demolished Home: दंगेखोरांना वठणीवर आणण्यासाठी इस्रायलनं वापरला CM योगी आदित्यनाथांचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:19 IST

यावेळी सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब आणि जळती टायरही फेकण्यात आली.

खरे तर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) ज्या पद्धतीने काम करतात, त्याची चर्चा, देशासह संपूर्ण जगभरात होत असते. मात्र, आता तर चक्क इस्रायलनेही तेथील दंगलखोरांचा सामना करण्यासाटी योगी आदित्यनाथ यांना फॉलो केले आहे.  इस्रायलच्या सैन्याने (Israel Army) आज (मंगळवारी) त्यांच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करणाऱ्यांची घरे उद्धवस्त केली आहेत. येथील वेस्ट बँक (West Bank) येथील वस्तीत राहणाऱ्या दोन पॅलेस्टाईनच्या संशयितांनी (Palestine Suspects) गोळी झाडून इस्रायली सुरक्षा रक्षकाची हत्या केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.

वेस्ट बँकमध्ये उद्धवस्त करण्यात आली घरे -गेल्या 29 एप्रिलला वेस्ट बँकमध्ये एका यहूदी वस्तीच्या प्रेवेश द्वाराजवळ झालेल्या गोळीबारात व्याचेस्लाव गोलेव्ह नावाच्या एका इस्रायली सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता. यानंतर, पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर, इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टाइनच्या दोन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

इस्रायली सेनिकांनी संशयितांची घरे केली भूईसपाट - इस्रायली सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नॉर्थ वेस्ट बँक भागातील करावत बानी हसन गावात संशयितांची घरे उद्धवस्त केली आहेत. इस्रायलली सैनिकांनी म्हटल्या प्रमाणे या कारवाईत त्यांनी त्यांच्या सैनिकांवर हल्लाही झाला. मात्र, घरे पाडण्याचे काम यशस्वीपणे पार करण्यात आले. यावेळी सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब आणि जळती टायरही फेकण्यात आली.

तत्पूर्वी, उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशाच प्रकारची कारवाई करत, तेथील गुन्हेगारांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर चालवत ती भूईसपाट करण्याची कारवाई केली आहे. या यादीत मोठ-मोठ्या गुन्हेगारांच्या नावाचाही समावेश आहे. यानंतर योगींच्या पावलावर पाऊल ठेवत मध्य प्रदेशातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

टॅग्स :Israelइस्रायलyogi adityanathयोगी आदित्यनाथTerrorismदहशतवादterroristदहशतवादी