इस्रायलने येमेनची राजधानी सनामध्ये हुथी बंडखोरांविरोधात मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हुथींच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली टीव्ही केएएनने (KAN) येमेनी माध्यमांचा हवाला देत यासंदर्भात वृत्त दिले आहे. या हल्ल्यात हुथी पंतप्रधान गालिब अल-रहावी आणि समूहाचे अनेक लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. हा येमेनच्या हुथीं विरोधातील सर्वात मोठा हल्ला असल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, हे प्रमुख नेते हुथी प्रमुख अल-मलिक हुथी यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रसारित भाषण बघत असतानाच हा हल्ला करण्यात आला. सर्वप्रथम हुथी-संचालित अल मसिरा टीव्हीने या हल्ल्याची माहिती दिली. यानंतर, संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ आणि आयडीएफनेही हल्ल्याची पुष्टी केली. मात्र, त्यांनी ठिकानांसंदर्भात तथापि, त्यांनी आपल्या लक्षांसंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही.
अपार्टमेंटमध्ये लक्ष्य बनवले - येमेनच्या अल-जुम्हुरिया वाहिनीने दलेल्या वृत्तानुसार हुथी पंतप्रधान अल-राहवी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह एका अपार्टमेंटमध्ये होते. याच वेळी त्यांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या चॅनल-१२ ने दिलेल्या वृत्तनुसार, हौथी संरक्षण मंत्री मोहम्मद नासेर अल-अथिफी आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करीम अल-गमारी हे देखील या हल्ल्यात मारले गेले असण्याची शक्यता आहे.मात्र, या तीनही हुथी नेत्यांच्या मृत्यूसंदर्भात कुठल्याही प्रकारचे अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. इस्रायली माध्यमांनीही, सध्या त्यांच्याकडे स्पष्ट माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच, सौदी वृत्तपत्र अल-हदथने वृत्त दिले आहे की, इस्रायली हवाई दलाने येमेनची राजधानी सना येथील काही घरांना लक्ष्य केले, जिथे वरिष्ठ अधिकारी लपून बसले होते.