शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

सुरक्षा परिषदेचा भारत कायमस्वरूपी सदस्य नाही, ही विसंगती नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 07:59 IST

फ्रान्स दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जगासमोर ठेवला प्रश्न, जागतिक संस्था आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करतात का? ज्या भूमिकेसाठी त्यांची स्थापना झाली, त्या भूमिका पार पाडण्यासाठी त्या संस्था सक्षम आहेत का?

नवी दिल्ली : सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य नाही, ही सर्वात मोठी विसंगती नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला. भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांना २५ वर्षे झाली. या निमित्ताने पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची ‘लेस इकोस’ या अग्रणी फ्रेंच दैनिकाचे निकोलस बर्रे आणि क्लेमेंच पेरुचे यांनी मुलाखत घेतली. त्यात पंतप्रधान मोदी यांनी विविध प्रश्नांवर सखोल उत्तरे दिली.  

आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये दक्षिणेची उपस्थिती वाढवण्यासाठी तुमची काय योजना आहे? या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की...‘जी-२०’ अध्यक्षपदाच्या काळात ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेंतर्गत ‘ग्लोबल साउथ’चा आवाज बनणे हे भारताच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. ‘जी-२०’च्या चर्चा आणि निर्णयांच्या केंद्रस्थानी ‘ग्लोबल साउथ’चे प्राधान्य आणि हित आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जी-२०’मध्ये आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मी ठेवला आहे. अर्थात, ‘ग्लोबल साउथ’ची बाजू मांडताना उत्तरेशी कोणतेही प्रतिकूल संबंध तयार व्हावे, अशी भारताची इच्छा नाही. 

जागतिक संस्था आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करतात का? ज्या भूमिकेसाठी त्यांची स्थापना झाली, त्या भूमिका पार पाडण्यासाठी त्या संस्था सक्षम आहेत का? विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या विसंगतीचे प्रतीक म्हणता येईल. सुरक्षा परिषदेची सध्याची स्थिती याचे द्योतक आहे. या संस्थेच्या रचनेमध्ये आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या संपूर्ण खंडांकडे दुर्लक्ष केले जात असताना ही संस्था जगाचे प्रतिनिधित्व करते, असे कसे म्हणता येईल?, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

शांतता आणि स्थैर्य निर्माण करणे, हेच आमचे उद्दिष्ट भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, आर्थिक, मानव-केंद्रित विकास आणि शाश्वतताविषयक सहकार्य, अशा सर्वच क्षेत्रांना सामावून घेणारी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रासह आमची भागीदारी कोणत्याही देशाच्या विरोधात किंवा कोणत्याही देशाच्या बळावर नाही. या प्रदेशातील आमच्या आर्थिक आणि संरक्षणविषयक हितसंबंधांचे रक्षण करणे, प्रवास तथा व्यापारासाठी दिशादर्शन सुनिश्चित करणे आणि आंतरराष्ट्रीय कायदा कायम राखणे, हाच आमचा उद्देश आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य निर्माण करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.

२०४७ मध्ये आम्हाला भारताला विकसित राष्ट्र झालेले पाहायचे आहे. अशी अर्थव्यवस्था, जी तिच्या सर्व नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संधी यांच्याशी संबंधित सर्व गरजांची पूर्तता करेल. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी