शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात इस्काॅन मंदिरावरील हल्ल्यात 3 ठार; 30 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 05:25 IST

संतप्त जमावाकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस; एक जणाची प्रकृती गंभीर

ढाका : बांगलादेशमध्ये शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी २०० जणांच्या जमावाने नौखाली येथे चौमुहानी परिसरातील इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला व ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या मंदिराची संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या देशात दुर्गापूजेच्या वेळी गुरुवारी काही मंदिरावर हल्ला चढविण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडला.बांगलादेशमधील इस्कॉनचे पदाधिकारी व्रजेंद्र नंदन दास यांनी सांगितले की, इस्कॉन मंदिरावर  गुंडांनी, दहशतवाद्यांनी हल्ला केला.  असा हिंसाचार पुन्हा होऊ नये म्हणून बांगलादेश सरकारने पावले उचलली पाहिजेत. इस्कॉन मंदिरातील हिंसाचारात ठार झालेल्यांपैकी एकाचे नाव श्रीपार्थदास (२५ वर्षे) असून त्याचा मृतदेह एका तलावात आढळला.  कोमिला शहरातील ननौर दिघी तलावानजिकच्या दुर्गापूजा मंडपात अन्य धर्माच्या धर्मग्रंथाची विटंबना करण्यात आल्याची बातमी समाजमाध्यमांद्वारे पसरली. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मंदिरांवर हल्ले चढविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिला होता. भारताचे घडामोडींवर बारीक लक्षबांगलादेशमधील मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रकारांकडे भारताचे बारीक लक्ष आहे. मंदिरांवरील हल्ले रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने योग्य उपाययोजना केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. गुरुवारी बांगलादेशमधील हाजीगंज, बंशखाली, शिबगंज, पेकुआ आदी ठिकाणी असलेल्या मंदिरांवर संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यांत ४ जण ठार झाले होते. त्यामुळे  बांगलादेशमधील २२ जिल्ह्यांत निमलष्करी दलाचे सैनिक तैनात करण्यात आले होते. सहा मूर्तींची केली विटंबनाबांगलादेशमधील मुन्शीगंज जिल्ह्यातील राशुनिया भागात कालिमाता मंदिरावर शनिवारी संतप्त जमावाने हल्ला करून तेथील सहा मूर्तींची विटंबना केली. या मंदिराच्या दरवाजाला असलेले कुलूप तोडून जमाव आत घुसला, अशी माहिती पोलिसांनी दिली. असा प्रकार या मंदिरात यापूर्वी कधीही घडला नव्हता अशी माहिती या मंदिराच्या संचालक मंडळाचे सरचिटणीस सुव्रत देवनाथ वणू यांनी दिली.