शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला; जमावाकडून तोडफोड, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:10 IST

ISKCON Radhakanta temple in Bangladesh : बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे.

ढाका : होळीच्या (Holi) एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची  (Bangladesh) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन मंदिरावर (Iskcon Temple) हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 150 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच, याठिकाणी लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. 

इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. मंदिराची भिंत पाडण्यात आल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. तसेच, याठिकाणी असलेले साहित्य सुद्धा लुटण्यात आले आहे.

दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पोलिसांनाही या हल्ल्याची माहिती दिली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही बांगलादेशातील मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौमुनी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण गौरा नित्यानंद ज्यू मंदिरावरही जमावाने हल्ला करून तोडफोड केली होती. या हल्ल्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली होती. यासोबतच इतर अनेक शहरांमध्ये मंदिरांवरही हल्ले झाले होते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशTempleमंदिर